मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी, तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक

रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रेल्वेने मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घोषिक करण्यात आला आहे.

रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रेल्वेने मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घोषिक करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. (Mega block on central railway harbor railway and western railway)

मेगा ब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10:25 ते दुपारी 3:35 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील लोकल ट्रेन माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद लोकल ट्रेन मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी 10:50 ते दुपारी 3:46 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर मार्गावरील पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11:05 ते सायंकाळी 4:05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन मेगाब्लॉकमधून वगळण्यात आली आहे.

पनवेल येथून सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

पनवेल येथून सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10:01 ते दुपारी 3:20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावणार आहेत. तसेच, ब्लॉकच्या कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. याशिवाय, ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गावरील सेवा उपलब्ध असणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड यार्डावरील दिवा मार्गिकेवर शनिवारी मध्यरात्री 12:15 ते 3:15 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.


हेही वाचा – घाटकोपरच्या पंतनगरमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली