घरताज्या घडामोडीपश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

Subscribe

विविध कामे करण्यासाठी रविवारी १४ मे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

विविध कामे करण्यासाठी रविवारी १४ मे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर अप-डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mega block on central railway western railway and harbor railway line)

मध्य रेल्वे

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.१० या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.१० पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील, ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्ग

पनवेल – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ०४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ०३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.४५ ते दुपारी ०३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ०३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ०३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते भाईंदर अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तसेच, शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.४५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.


हेही वाचा – कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात; कुणाचे सरकार येणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -