घरमुंबईMega Block : रविवारी सीएसएमटी ते चुनाभट्टी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, वांद्रे मार्गावरील...

Mega Block : रविवारी सीएसएमटी ते चुनाभट्टी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, वांद्रे मार्गावरील वाहतूकीवरही परिणाम

Subscribe

रेल्वे प्रशासनाकडून रविवारी म्हणजे 6 फेब्रुवारीला रेल्वेच्या मध्य मार्गाप्रमाणे हार्बर मार्गावरही देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर रेल्वेमार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी अप आणि डाऊन मार्गावर मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. दरम्यान वांद्रे हार्बर मार्गावरही हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक असणरा आहे. तर चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

- Advertisement -

या मेगाब्लॉकदरम्यान पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी की ५.२.२०२२ (शुक्रवार/शनिवार) च्या ००.०० तास (मध्यरात्री) ते ७.२.२०२२ (सोमवार/मंगळवार) च्या २४.०० तास (मध्यरात्री) पर्यंत मुख्य मार्गावर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत केला जाईल.

हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, त्यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -