घरताज्या घडामोडीरविवारी रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक घोषित

रविवारी रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक घोषित

Subscribe

रविवारी लोकलने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. रविवारी रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नसणार आहे.

रविवारी लोकलने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. रविवारी रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नसणार आहे. तसेच, पश्चिम रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक नसणार आहे. मात्र, रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

रविवारी हार्बर मार्गावरील चुनाभट्टी/माहीम ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी ११ वाजल्यापासून सांयकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/माहीम पर्यंत सकाळी ११ वाजून ४० मिनिटापासून ते सांयकाळी ४ वाजून ४० मिनिटापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

- Advertisement -

ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटापासून ते सांयकाळी ४ वाजून १०मिनिटापर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

तांत्रिक कामासाठी उद्या फक्त हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावर जरी मेगाब्लॉक असला तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच ठाणे महानगरपालिकेच्या बस उपलब्ध असतात. प्रवाशी बसचा पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जाऊ शकता.

- Advertisement -

हेही वाचा – पुणेकरांचा रिक्षाप्रवास महागला; भाडेदरात 4 रुपयांची वाढ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -