घरताज्या घडामोडीMega block Update : कळवा-दिवा धीम्या मार्गावर २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक

Mega block Update : कळवा-दिवा धीम्या मार्गावर २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक

Subscribe

नवीन वर्षाच्या सुरुवातीला रविवारी मध्य रेल्वेवर २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक आहे.कळवा ठाकुर्ली या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प असणार आहे.मध्य रेल्वेकडून ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर नवीन रुळ टाकण्यात येत आहे. येथे नवीन रुळ टाकण्यात येणार असून, सध्याच्या धीम्या मार्गावरील रुळांना जोडण्यात येणार आहे. कळवा अणि दिवा दरम्यान स्लो कॉरिडॉरवर पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामासाठी रविवारी २ जानेवरी २.०० वाजल्यापासून ते सोमवारी ३ जानेवारीला २.०० वाजेपर्यंत हा २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे.

  • या जम्बो मेगाब्लॉक दरम्यान, सर्व उपनगरीय सेवांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे.
  • याशिवाय अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आले आहेत.
  • हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, मेगाब्लॉक दरम्यान, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर कोणतीही लोकल थांबणार नाही.
  • या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
  • रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी नगरपालिका परिवहन उपक्रमांशी समन्वयाने बसेसची व्यवस्था केली आहे.
  • ब्लॉक कालावधीनंतर अप आणि धीम्या मार्गावरील सेवा रेल्वे उड्डाणपुलावरुन नव्याने उभारलेल्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावरुन धावतील आणि मुंब्रा स्थानकात नवीन फलाटावर थांबतील.

- Advertisement -

 


हे ही वाचा – ईश्वर चिठ्ठी म्हणजे काय ? शिवसेनेच्या बागलकरांप्रमाणे सतीश सावंतांनाही ईश्वर चिठ्ठीचा फटका

- Advertisement -

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -