घरताज्या घडामोडीMega Block : हार्बर लाईनवर ८ तासांचा मेगाब्लॉक, मेन लाईनवरील वेळापत्रक...

Mega Block : हार्बर लाईनवर ८ तासांचा मेगाब्लॉक, मेन लाईनवरील वेळापत्रक कसं आहे?

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर मेगाब्लॉक नाही. मध्य रेल्वे रविवार २०.३.२०२२ रोजी हार्बर लाईनच्या उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विभागातील मेन लाईनवर कोणताही मेगाब्लॉक चालवला जाणार नाही. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. अशी सूचना देण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.


हेही वाचा : Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -