घरमुंबईरविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

Subscribe

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मार्गावर रविवारी 1 नोव्हेबर रोजी मेगाब्लॉकघेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरिल ठाणे-कल्याण अप व डाउन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल – वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉकअसणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गांवर माहीम ते मुंबई सेंट्रल दरम्यान 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर च्या मध्यरात्री रात्रकालीन पाच तासाचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप व डाउन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.33 ते दुपारी 2.48 दरम्यान सुटणार्‍या जलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच
सकाळी 10.26 ते दुपारी 3.19 दरम्यान कल्याण येथून सुटणार्‍या जलद मार्गावरील सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर हार्बर रेल्वे मार्गांवरील
पनवेल ते वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.दरम्यान पनवेल, बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 4.01 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणार्‍या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.44 ते दुपारी 3.16 दरम्यान बेलापूर, पनवेलला सुटणार्‍या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर पनवेलहून दुपारी 2.24 वाजता ठाण्याकडे जाणारी ट्रान्स हार्बर मार्गावरील अप सेवा व ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे येथून दुपारी 1.24 वाजता पनवेलला जाणारी सेवा रद्द राहील.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते मुंबई सेंट्रल दरम्यान 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर च्या मध्यरात्री रात्रकालीन पाच तासाचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान रेल्वे रूळ, सिंग्णल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यासह विविध देखभाल दुरुस्तीची काम केली जाणार आहे. तर माहीम आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप जलद मार्ग आणि पाचव्या रेल्वे मार्गावर शनिवारी ते रविवारी रात्री 11 ते पहाटे 4 वाजता पर्यंत हा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. जम्बोब्लॉक दरम्यान सांताक्रूज आणि मुंबई सेंट्रल,चर्चगेट दरम्यान अप मार्गावरील सर्व जलद ट्रेन धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -