Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मध्य, हार्बर मार्गावर 'या' वेळत असणार मेगाब्लॉक

मध्य, हार्बर मार्गावर ‘या’ वेळत असणार मेगाब्लॉक

Related Story

- Advertisement -

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वे आणि उपनगरीय भागांत रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार मुख्य लाइन – माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०४.०५ दरम्यान ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा डाऊन धीम्या मार्गावर वळविली जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्यावर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा आपल्या गंतव्य स्थानकावर पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आगमन होणार्‍या अप जलद सेवा अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने आपल्या गंतव्य स्थानकावर पोहोचतील.

हार्बर लाइन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर लाइन सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान तसेच सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी / बेलापूर / पनवेल साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा आणि सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वांद्रे / गोरेगाव साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशी येथून सुटणाऱ्या अप हार्बर सेवा व तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत गोरेगाव / वांद्रे येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी राहील. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती.

- Advertisement -