घरमुंबईमुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Subscribe

मुंबईत आज पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे सीएसएमटी ते पनवेल लोकल सेवा तब्बल पाच तास बंद राहणार आहे.

आज सुट्टीच्या निमित्ताने अनेक मुंबईकर फिरण्यासाठी घराच्या बाहेर पडण्याचा विचार करत असतील. परंतु आज मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीएसएमटी ते पनवेल या मार्गांवर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन पर्यंत एकही लोकल चालवण्यात येणार नाही, पण पनवेल ते वाशी आणि सीएसटी ते कुर्ला अशा विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर घेण्यात येणाऱ्या या मेगाब्लॉकचा परिणाम मुंबईच्या लोकल वाहतुकीवर होणार आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते जोगेश्वरी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

पश्चिम रेल्वे ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते जोगेश्वरी या रेल्वे स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ज्यामुळे या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हार्बर रेल्वे ब्लॉक
हार्बर रेल्वे म्हणजेच पनवेल ते सीएसएमटी दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10 वाजून 34 मिनिटांनी ते दुपारी 03 वाजून 36 मिनिटे या वेळात वाशी, बेलापूर आणि पनवेल येथे जाणारी एकही लोकल सुटणार नाही. तर वाशी, बेलापूर आणि पनवेल येथून सीएसएमटीसाठी 10 वाजून 16 मिनिटांनी ते दुपारी 03 वाजून 47 मिनिटांनी एकही लोकल सुटणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 09 वाजून 30 मिनिटांनी ते दुपारी 02 वाजून 45 मिनिटे या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच या गाड्या त्यांच्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10मिनिटे उशिराने धावतील.

- Advertisement -

तसेच कल्याण येथून सकाळी 10 वाजून 28 मिनिटांपासून ते दुपारी 03 वाजून 25 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गांदरम्यान पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने ठाणे-वाशी मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. तर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.


हेही वाचा – भायखळ्याच्या राणी बागेतील १२० वर्षे जुन्या प्याऊला नवीन संजीवनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -