घरमुंबईमध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Subscribe

मुंबई : मध्य रेल्वे मुंबई विभागाकडून रविवार, १२ मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता  मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून या गाड्या त्यांच्या संबंधित नियोजित स्टेशनवर थांबतील. तसेच ठाणे स्थानकाच्या पुढे जाणाऱ्या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.

- Advertisement -

ठाणे स्थानकातून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित नियोजित स्टेशनवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहील.

- Advertisement -

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष रेल्वे २० मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -