रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा-माटुंगा अप व डाउन जलद मार्गांवर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाउन धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी 31 जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा-माटुंगा अप व डाउन जलद मार्गांवर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाउन धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा अप व डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान सीएसएमटी येथून सुटणार्‍या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. भायखळा ते माटुंगा दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. या गाड्या नियोजित वेळापत्रकानंतर १५ मिनिटांनी गंतव्यस्थानी पोहोचतील. माटुंगानंतर निर्धारित मार्गावर चालविण्यासाठी जलद सेवा जलद मार्गावर वळविण्यात येतील. कुर्ला रेल्वे स्थानकांवरुन अप जलद उपनगरीय लोकल सेवा सकाळी 11.06 ते दुपारी 3.45 या वेळेत माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि भायखळा रेल्वे स्थानकांवरुन अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येणार आहे. या सेवा नियोजित वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटांनंतर गंतव्यस्थानी पोहोचतील. तर हार्बर मार्गावर कुर्ला -वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान सीएसएमटीहून सुटणारी वाशी,बेलापुर, पनवेल डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.18 ते दुपारी 3.39 दरम्यान रद्द राहतील. पनवेल, बेलापुर, वाशी येथून सकाळी १०.21 ते दुपारी 3.41 पर्यंत सीएसएमटीकरीता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत कुर्ला रेल्वे स्थानकांवरुन विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरच्या देखभालीसाठी रविवारी बोरीवली ते गोरेगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अप डाउन धीम्या मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवरील सर्व लोकल सेवा बोरीवली आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अप डाऊन जलद मार्गांवर वळविल्या जाणार आहे. तसेच यादरम्यान बोरीवली रेल्वे स्थानकांचा प्लेटफॉर्म क्रं 1,2,3 आणि 4 वरुन कोणतीही रेल्वेचे आगमन आणि प्रस्थान होणार नाही आहे.


हेही वाच – Mumbai Local: पुन्हा तेच! रेल्वे म्हणतंय लोकलचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलाय!