Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबई विभागातील 'या' उपनगरी भागांवर मेगाब्लॉक

मुंबई विभागातील ‘या’ उपनगरी भागांवर मेगाब्लॉक

याभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत.

Related Story

- Advertisement -

मुंबई विभागातील उपनगरी भागांवर देखभाल काम करण्यासाठी ४ एप्रिल रोजी मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.

मेगाब्लॉकसाठी परिचालित करण्यात येणाऱ्या भागांची नावे पुढीलप्रमाणे –

- Advertisement -

१. ठाणे-कल्याण अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० पर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे.
मुलुंड येथून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणा-या डाउन धीम्या व अर्धजलद मार्गावरील सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा ठाणे, दिवा आणि डोंबिवली या स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणा-या धिम्या व अर्धजलद अप मार्गावरील सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळविल्या जातील आणि डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील, पुढे मुलुंडला अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशीराने पोहोचेल .
या ब्लॉक कालावधीत कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकूर्ली स्थानकांवर उपनगरी सेवा उपलब्ध होणार नाहीत.

- Advertisement -

२. पनवेल – वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर नेरुळ / बेलापूर-खारकोपर हार्बर लाईनसह सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ पर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे.
हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान पनवेल / बेलापूर करीता सुटणारी व अप हार्बर मार्गावर पनवेल / बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी सेवा रद्द राहतील.

ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाणेकडे जाणार्‍या तर ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान पनवेलला जाणा-या सेवा रद्द असतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला विभागात विशेष गाड्या चालविल्या जातील. तसेच ठाणे-वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असेल. या सर्व बदलांमुळे प्रवाशांना गैरसोय होत असली तरी पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत.

- Advertisement -