घरमुंबईमेहुल चोक्सीचे अटक वॉरंटला हायकोर्टात आव्हान

मेहुल चोक्सीचे अटक वॉरंटला हायकोर्टात आव्हान

Subscribe

चोक्सीविरोधात ईडीने 2 जुलै रोजी पीएमएलए कायद्याखाली नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची विनंती केली होती.

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावल्याप्रकरणी इंटरपोलने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. चोक्सीविरोधात ईडीने 2 जुलै रोजी पीएमएलए कायद्याखाली नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची विनंती केली होती.

त्यानुसार पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले . त्याला मेहुल चोक्सी याने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात त्याने ईडी आणि सीबीआयने केलेले सगळे आरोप चुकीचे आहेत.

- Advertisement -

मला घोटाळ्यात अडकवले जाते आहे आणि माझी मालमत्ता चुकीच्या पद्धतीने सील करण्यात आली आहे, असा आरोप त्याने केला होता. पीएनबी घोटाळ्यात फरार झालेला नीरव मोदी याचा चोक्सी हा मामा आहे. अँटिग्वा या ठिकाणी मेहुल चोक्सी वास्तव्यास आहे. या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच मेहुल चोक्सीचा व्हिडिओ समोर आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -