घरट्रेंडिंगनाना पाटेकरांनी तनुश्रीला व्हॅनिटीमध्ये बोलावलं होतं - स्पॉटबॉयचा खुलासा

नाना पाटेकरांनी तनुश्रीला व्हॅनिटीमध्ये बोलावलं होतं – स्पॉटबॉयचा खुलासा

Subscribe

तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपांविरोधात प्रत्यक्षदर्शी स्पॉटबॉयचा खुलासा

तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपांविरोधात आता एका प्रत्यक्षदर्शी स्पॉटबॉयने खुलासा केला आहे. तनुश्री दत्ताने कोर्टात जायला हवं, जे सत्य आहे ते समोर आलचं पाहिजे. तनुश्रीसोबत केलेले गैरवर्तन हे १०० टक्के नाही तर १०१ टक्का खरे असल्याचे रामदास बोर्डे या स्पॉटबॉयने लोकमतशी बोलताना म्हटले आहे. मी जो खुलासा केला आहे ते मी सर्व कोर्टात बोलायला तयार असल्याचे देखील बोर्डे यांनी सांगितले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, मी जो खुलासा केला आहे त्यामुळे माझ्यावर दबाब देखील टाकण्यात येईल याचीही मला कल्पना आहे. असे देखील ते म्हणाले. मात्र असे असले तरी देखील मी सत्याच्या बाजूने आहे.

नेमके काय म्हणाला स्पॉटबॉय?

हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरांनी तनुश्रीसोबत केलेले गैरवर्तन हे खरे असल्याचे बोर्डे या स्पॉटबॉयने सांगितले आहे. नाना पाटेकरांनी सेटवर असताना तनुश्री दत्ताला दुपारी १२ च्या दरम्यान व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं होत असा खुलासा बोर्डे यांनी केला आहे. ज्यावेळी नाना पाटकरांनी तनुश्रीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं त्यानंतर तिथून ती वैतागून बाहेर पडली. ती तडक तिथून निघून डान्स मास्टर गणेश आचार्य यांच्याकडे गेली आणि तिने आपली तक्रार केली.

- Advertisement -

काय बोले स्पॉटबॉय?

व्हॅनिटी व्हॅनमधून ज्यावेळी तनुश्री दत्ता निघाली आणि ती गणेश आचार्यांशी जोरजोरात इंग्रजीमध्ये भांडत होती. ती जे काही बोलत होती त्यावरुन इतकेच कळत होते की, तिच्याशी नानाने काहीतरी चुकीचे वर्तन केले होते. तिच्या बोलण्याचा रोख तसाच होता. मात्र सेटवर सर्वजण तिची समजूत काढत होते. तसेच नाना पाटेकर मोठा माणूस आहे तुझे करीअर बरबाद होईल असे तिला सांगण्यात येत होते. मात्र त्यावेळी तनुश्रीने तिची बाजू ओरडून सांगत होती. काही वेळातच ती तिथून निघून गेली. त्यानंतर पाटेकरही व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आले. काही घडलेच नाही अशा अविर्भावात ते वावरु लागले. पण शुटींग बघणाऱ्या स्पॉटबॉय यांना त्या रोजगाराची चिंता
असल्यामुळे त्यावेळी कोणीही काही बोले नाही.

अनेक नवख्या अभिनेत्रींबाबत घडत

अनेक नवख्या तरुणींसोबत असे घडते. ज्या तरुणी आपली स्वप्न घेऊन येतात त्यांच्याबाबतीत असे घडते. मात्र मला आता माझ्या जिवाची आणि रोजगाराची देखील पर्वा नाही. माझा एकच उद्देश आहे की, सत्य समोर आले पाहिजे असे देखील बोर्डे म्हणाले आहे. कलाकार सोडून जे कोणी लोक त्या ठिकाणी होते त्यांना हेच वाटत आहे की, नाना पाटेकर चुकीचे वागले आहेत. तनुश्रीला त्यांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावले होते आणि तिथूनच वादाला सुरुवात झाली.

- Advertisement -

वाचा – #MeToo नाना पाटेकरांना धक्का; ‘हाऊसफुल्ल ४’ मधून दिला डच्चू!

वाचा – #MeToo नाना पाटेकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

वाचा – #MeToo – नाना पाटेकर तनुश्री दत्ता वादामध्ये सई ताम्हणकरची उडी, सई म्हणते…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -