घरमुंबईमुंबई खरंच तुंबणार नाही?

मुंबई खरंच तुंबणार नाही?

Subscribe

MMRDA आणि MMRCAच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन

यंदा पावसात मेट्रो प्रकल्पामुळे मुंबई तुंबणार नसल्याचे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MMRCA) यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई तुंबू नये याकरता मे महिन्याच्या सुरुवातीलाच ठिकठिकाणी नाले सफाई देखील करण्यात आली आहे. ही नालेसफाई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. मात्र, भाजपने शिवसेनेला दोष देत ‘याही वर्षी मुंबई तुंबणार’ असा दावा केला आहे.

किमान ४ मान्सून काम चालू राहणार

MMRDA आणि MMRCAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता येत्या पावसात मुंबई तुंबणार नसल्याचा दावा एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे मेट्रोचे काम किमान ४ मान्सून चालू राहणार असून यासाठी विविध उपाययोजना देखील आखल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. कुलाबा ते सीप्झ दरम्यान शहरातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो मार्ग एमएमआरसीकडून तयार केला जाणार असल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

२४१ डिवॉटरिंग पंप

एमएमआरसीने महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसह मेट्रोचे काम सुरु असलेल्या १२ ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी पाहाणी केली होती. यामध्ये काही ठिकाणी पाणी निघून जाण्यासाठी कनेक्शन द्यावे लागणार होते. त्यानुसार ३३ किलोमीटर मार्गावर २४१ डिवॉटरिंग पंप लावण्यात आले. हे काम महापालिका अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात सात मार्गांपैकी तीन ठिकाणी मेट्रोच्या कामाचे निरीक्षण पूर्ण झाले आहे.
ज्या भागात अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे अशा ठिकाणी २५ पाण्याच्या टाक्या बसवण्यात येणार आहेत. ह्या टाक्यांमध्ये जे पाणी साठणार आहे त्या पाण्यातील गाळमुक्त होऊन ते स्वच्छ पाणी समुद्रात सोडले जाणार आहे.

मेट्रोचे काम सातव्या टप्पात

डी एन ए नगर मेट्रो, दहिसर आणि अंधेरी पूर्व या दरम्यान मेट्रोचे काम सातव्या टप्प्यात सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. यामुळे एमएमआरडीएने ३१ मे पूर्वी विविध ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी १० पंप बसवले आहेत. त्याचबरोबर आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्राधिकरणाने ९ अभियंते आणि १०० कर्मचारी देखील तैनात केले आहेत. या कामाची सुरुवात २०१६ पासून झाली असून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही सावधगिरीने पावले उचलली असल्याची माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिली.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -