घरमुंबईचिंताजनक : पावसाळ्याच्या तोंडावर ५४५ कुटुंब धोक्याच्या घरात; MHADA ने जाहीर केली...

चिंताजनक : पावसाळ्याच्या तोंडावर ५४५ कुटुंब धोक्याच्या घरात; MHADA ने जाहीर केली यादी

Subscribe

 

मुंबईः MHADA ने मुंबईतील अतिधोकादायक १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या यादीत गेल्यावर्षीच्याच ७ इमारती आहेत. या धोकादायक इमारतींमध्ये ४२४ निवासी आणि १२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवाशी राहतात. या रहिवाश्यांनी सुरक्षेचे पालन करावे. घरे खाली करण्यास सहकार्य करावे. पावसाळ्यात काही धोका जाणवल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी, अशी सुचना MHADA ने केली आहे.

- Advertisement -

पावसाळा आला की म्हाडा इमारतींचे सर्व्हेक्षण करते. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी जाहिर करण्यात येते. त्यानुसार म्हाडाने इमारतींचे सर्व्हेक्षण करुन धोकादायक इमारतींची यादी जाहिर केली आहे. या इमारतींमध्ये एकूण ५४५ रहिवाशी राहतात. त्यातील १५५ रहिवाशांनी घरे खाली करण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था केली आहे. २१ रहिवाश्यांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. अन्य रहिवाश्यांना घरे खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. २२२ रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी MHADA ला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

हेही वाचाःठाणेकर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अती धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात

- Advertisement -

धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांनी घरे खाली करावीत. पावसाळ्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी रहिवाश्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन MHADA ने रहिवाश्यांना केले आहे.

   या आहेत धोकादायक इमारती

1)   इमारत क्रमांक 4-4 ए,नवरोजी हिल रोड क्र. 1, जॉली चेंबर (मागील वर्षीच्या यादीतील)
2)   इमारत क्रमांक 74 निझाम स्ट्रीट  (मागील वर्षीच्या यादीतील)
3)  इमारत क्रमांक 42, मस्जिद स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
4)  इमारत क्रमांक 61-61ए , मस्जिद स्ट्रीट
5)  इमारत क्रमांक 212 जे पांजरपोळ लेन
6)इमारत क्रमांक 173-175-179 व्ही के बिल्डिंग , प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी
7)इमारत क्रमांक 2-4-6 नानुभाई देसाई रोड, मुंबई
8)  इमारत क्रमांक 1-23  नानुभाई देसाई रोड, मुंबई
9)  इमारत क्रमांक  351 ए, जे एस एस रोड मुंबई
10)इमारत क्रमांक 387-391 बदामवाडी, व्ही .पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
11)  इमारत क्रमांक 17 नारायण निवास , निकटवाडी
12) इमारत क्रमांक  31सी व 33ए ,आर रांगणेकर मार्ग व 19 पुरंदरे मार्ग, गिरगावचौपाटी  (मागील वर्षीच्या यादीतील)
13) इमारत क्रमांक 104-106 ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील)
14) इमारत क्रमांक 40 कामाठीपुरा 4 थी गल्ली
15) अंतिम भूखंड क्र. 721 व 724 टीपीएस – 3 विभाग, इमारत क्रमांक 40 बी व 428, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)

मुंबई महापालिकेच्या यादीत २२६ अतिधोकादायक इमारती

मुंबई महापालिकेने मुंबईतील एकूण 226 अतिधोकादायक इमारतींची यादी पावसापूर्वीच जाहित केली आहे. तसेच, पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडून कोणतीही हानी होऊ नये यासाठी आधीच धोकादायक असलेल्या इमारती खाली करून नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी केले आहे. मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी महापालिकेचे संकेतस्थळ http://www.mcgm.gov.in यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईतील एकूण 226 अतिधोकादायक इमारतींमध्ये, पश्चिम उपनगरातील सर्वाधिक 126 अतिधोकादायक इमारतींचा, त्याखालोखाल पूर्व उपनगरांतील 65 अतिधोकादायक इमारतींचा आणि शहर भागातील 35 अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे.

‘सी-१’ प्रवर्गातील धोकादायक इमारतींची विभागनिहाय यादी

ए विभाग-
१) मेहेर मॅन्शन, कूपरेज मार्ग, कुलाबा; २) नोबल चेंबर, जन्मभूमी मार्ग, फोर्ट; ३) जे. के. सोमानी, ब्रिटिश हॉटेल लेन, फोर्ट.

बी विभाग-
१) पारेख चेंबर, १२५-१२७, शेरीफ देवजी मार्ग; २) पुरुषोत्तम इमारत, २०२-२०४, सॅम्यूएल स्ट्रिट आणि ५७-५९-६१, युसूफ मेहेरअली मार्ग; ३) २९६, सॅम्यूएल स्ट्रिट.

सी विभाग-
१) एच. एम. पेटिट विडोज होम, इमारत क्रमांक २२५, सीएस क्रमांक २१७९, भुलेश्वर विभाग, जेएसएस मार्ग आणि बीजे मार्ग, ठाकूरद्वार; २) शील भवन, इमारत क्रमांक १४, चौथा मरिन मार्ग, धोबी तलाव.

डी विभाग-
१) अखिल भारत भवन कम्पाऊंड, सी. एस. क्रमांक ३१८, ताडदेव विभाग, बेलासिस मार्ग; २) शालीमार एक्झीबिटर्स, ३३५, शालीमार हाऊस, एम.एस.अली मार्ग, ग्रँट मार्ग; ३) लोहाना महापरिषद भूवन इमारत, १०, चौथी खेतवाडी लेन, एस.व्ही.पी.मार्ग; ४) सी.एस. क्रमांक ३ ए/७३०, ताडदेव विभाग, १३६, सर्वोदय इस्टेट, सर्वोदय मिल कम्पाऊंड, उर्मी आंगन इमारतजवळ; ५) मेफेअर संकुलामधील दोन बांधकामे (गॅरेज), लीटल गिब्ज मार्ग, मलबार हिल्स; ६) ५१-सी, अमृतसरवाला पंजाबी वाळकेश्वर धर्मशाळा ट्रस्ट इमारत, बाणगंगा; ७) धनश्री इमारत, पी. जी. सोलंकी मार्ग, घास गल्ली; ८) भाटिया निवास, बाणगंगा छेद गल्ली.

ई विभाग-
१) त्रिवेणी अपार्टमेंट, मकबा चाळीजवळ, एस. ब्रीज, भायखळा (पश्चिम); २) बॉम्बे सोप फॅक्टरी, हुसैनी बाग, मदनपुरा.

इमारत अतिधोकादायक झाल्यास प्राथमिक लक्षणे

१) इमारतीच्या आर. सी. सी. फ्रेम कॉलम, बीम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल होत असल्याचे आढळल्यास उदा. इमारतीचे कॉलम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा बीम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखे दिसून आल्यास.
२) इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसून आल्यास.
३) इमारतीच्या कॉलम मधील भेगा वाढत असल्याचे दिसून आल्यास.
४) इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसून आल्यास.
५) इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखा दिसल्यास.
६) इमारतीच्या आर. सी. सी. चेंबर्स (कॉलम, बीम्स) व विटांची भिंत यातील सांधा / भेगा वाढत असल्यास.
७) स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्यास.
८) इमारतीच्या गिलाव्यामध्ये (प्लास्टर) मोठ्या प्रमाणात भेगा वाढत असल्यास.
९) इमारतीच्या काही भागात विशिष्ट आवाज होत असल्यास.
१०) इमारतीच्या स्लॅब, बीम, कॉलमच्या भेगांमुळे लोखंडी शिगांचा आकार गंजल्यामुळे कमी झालेला असल्यास.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -