Eco friendly bappa Competition
घर मुंबई mhada house : मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांसाठी सोडत; अवघ्या 22 लाखांत...

mhada house : मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांसाठी सोडत; अवघ्या 22 लाखांत मिळणार स्वप्नातील घर

Subscribe

गोरेगावनंतर म्हाडा अँटॉप हिल, कन्नमवारनगर आणि दक्षिण मुंबईतल्या घरांचाही सोडत निघणार आहे. यात जवळपास 1 हजार घरं बांधली जाणार आहेत.

मुंबईत घर घेण हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र दिवसेंदिवस घरांच्या वाढत्या किमती पाहता मुंबईत घर घेण हे अनेकांसाठी स्वप्नचं राहत. मात्र सर्वसामान्यांचे हे स्वप्न आता म्हाडा पूर्ण करणार आहे. कारण म्हाडा आता जुलै महिन्यांत गोरेगाव परिसरात 4 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. या लॉटरीतून सर्वसामान्यांना अवघ्या 22 लाखांत स्वप्नातील घरं घेता येणार आहे. मात्र यासाठी सर्वसामान्यांना जुलैपर्यंत वाट बघावी लागणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून या घरांच्या सोडतीची तयारी सुरू झाली आहे. यात मुंबई उपनगरात म्हाडाकडून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशी वन बीएचके आकाराची घरी उभारली जाणार आहेत.

गोरेगावच्या पहाडी परिसरात म्हाडा ही घरं बांधणार आहे. या 4 हजार घरांपैकी सर्वाधिक म्हणजे दोन हजार घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील. वन बीएचके आकाराची ही घरं अगदी परवडणाऱ्या किंमतीत म्हणजे 22 लाखांत उपलब्ध होणार आहेत.

- Advertisement -

अत्यल्प उत्पन्न गटासाठी म्हाडा गोरेगाव परिसरात 1947 घरे बांधणार आहे. तर लॉटरीतील उर्वरित घरे ही उन्नत नगर येथे बांधली जाणार आहे. गोरेगाव पश्चिम येथील बांगूर नगर परिसरातील पहाडी गोरेगावमध्ये म्हाडा 23  मजल्याच्या सात इमारती उभ्या राहणार आहे. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 322.60 चौरस फूट क्षेत्रफळाची 1239 घरे असणार आहेत. या घराची किंमत 22 लाख रुपयांपासून सुरु होणार आहे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी 794.31 चौरस फूट क्षेत्रफळाची 227 घरे उभारली जाणार आहेत. याची किंमत 56 लाख असेल. याशिवाय उच्च उत्पन्न गटासाठी 978.56 चौरस फूट क्षेत्रफळाची 105 घरे बांधली जातील. याची किंमत 69 लाख असेल.

म्हाडा यात उन्नत नगर क्रमांक 2 येथील प्रेम नगरमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 708 घरे बांधणार आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी 736 घरे बांधली जाणार आहेत. ही घरे 482.98 चौरस फुटांची असतील. याची किंमत 30 लाख असेल.

- Advertisement -

गोरेगावनंतर म्हाडा अँटॉप हिल, कन्नमवारनगर आणि दक्षिण मुंबईतल्या घरांचाही सोडत निघणार आहे. यात जवळपास 1 हजार घरं बांधली जाणार आहेत.


Mumbai Byculla Fire : भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला भीषण आग


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -