घरमुंबईMHADA Lottery 2021: खुशखबर! यंदाच्या दसऱ्याला निघणार ९ हजार म्हाडाच्या घरांची सोडत

MHADA Lottery 2021: खुशखबर! यंदाच्या दसऱ्याला निघणार ९ हजार म्हाडाच्या घरांची सोडत

Subscribe

आता परवडणाऱ्या किंमतीतील घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे कारण तब्बल दोन वर्ष रखडल्यानंतर म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. यंदा दसऱ्याला म्हाडाच्या ९ हजार घरांची सोडत निघणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे ९ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. २०१८ मध्ये ९ हजार १८ घरांसाठी सोडत निघाली होती. मात्र आता मुंबई लगतच्या भागांत परवडणारी घरं घेण्याचे अनेकांचं स्वप्न साकार होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील ६ हजार ५००, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील २ हजार तर २० टक्के योजनेतील ५०० घरांचा या सोडतीत समावेश आहे.

या ठिकाणी ही घऱं उपलब्ध होणार

म्हाडाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा दसऱ्याला म्हाडाच्या ९ हजार घरांची सोडत निघणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती मात्र आता ही सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे. यंदाच्या दसऱ्याला ९ घरांची सोडत काढण्यात येणार आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील, असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. मीरारोड, ठाण्यातील वर्तकनगर, विरारमधील बोळींज, कल्याण, वडवली, आणि ठाण्यातील गोठेघर या ठिकाणी ही घऱं उपलब्ध असतील.

- Advertisement -

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण

दोन वर्षांपासून मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत रखडली असली तरी आता शहराजवळ परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर घेण्याची संधी मुंबई-ठाणेकरांना मिळणार आहे. मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांत घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत. अशातच मुंबईत घर घेण्याचे अनेकांचं स्वप्न असतं. पण, बऱ्याचदा मुंबईत घरं घेणं परवडत नाही. पण म्हाडाच्या सोडतीमुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -