घरताज्या घडामोडीविकासकांनी थकविले म्हाडाचे १६७ कोटी; अनेकांना काम थांबविण्याच्या नोटीसा

विकासकांनी थकविले म्हाडाचे १६७ कोटी; अनेकांना काम थांबविण्याच्या नोटीसा

Subscribe

मुंबईतील म्हाडाच्या पुर्नर्विकास योजनांतील सुमारे ४४ विकासकांनी संकम्रण शिबीरातील ३ हजार ३५३ घरे स्वत:च्या ताब्यात ठेवली असून या घरांच्या भाडेपोटी येणारी सुमारे १६७ कोटींची रक्कम थकविल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील म्हाडाच्या पुर्नर्विकास योजनांतील सुमारे ४४ विकासकांनी संकम्रण शिबीरातील ३ हजार ३५३ घरे स्वत:च्या ताब्यात ठेवली असून या घरांच्या भाडेपोटी येणारी सुमारे १६७ कोटींची रक्कम थकविल्याची माहिती मंगळवारी उघडकीस आली आहे. या ४४ विकासकांना म्हाडातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्या असून लवकरच यांच्याविरोधात आता कायदेशीर लढाई लढविली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील १२ थकबाकीदार विकासकांविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली.

लवकरच न्यायालयात दाद मागणार

मुंबईतील म्हाडाच्या पुनर्विकास योजनांमध्ये असलेल्या खासगी विकासकांनी भाडेपोटी येणारे १६७ कोटी रुपये थकविल्याप्रश्नी आमदार बालाजी किणेकर, प्रताप सरनाईक, सुनील प्रभू, आशिष शेलार, अजय चौधरी, कॅप्टन सेल्वन यांच्यासह अनेकांनी याप्रश्नी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वरील माहिती दिली. दरम्यान, या ४४ विकासकांपैकी ६ विकासक एसआरए अंतर्गत देखील पुनर्विकास करीत असून त्या प्रकल्पांना देखील काम थांबवा नोटीस देण्यात आल्या असून या विकासकांना इतर परवानग्या देण्यात येऊ नये, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना मंडळाकडून कळविण्यात आल्याचे आव्हाड यांनी दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या ४४ विकासकांना म्हाडा अधिनियम १९७६ चे कलम १८० अंतर्गत कारवाई करण्यासाठी विकासकांचे बँक खात्याचा तपशील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विकासक यांचे जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशीलाचा अहवाल मागविण्यात आला आहे. या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. तर या विकासकांकडील संक्रमण गाळ्यापोटी थकीत भाड्याच्या वसुलीकरिता हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असून त्यासाठी वकिलांच्या पॅनलकडून अहवाल मागविण्यात आला असून तो आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अनेकांची धावपळ सुरु

तर विकासकांना काम थांबवा नोटीस दिल्यानंतर १ एप्रिल २०१६ ते ३१ जानेवारी २०२० कालावधी दरम्यान एकूण २७ विकासक यांनी एकूण १०३ कोटींचा थकीत भाडे रक्कमेचा भरणा केली असल्याचे आव्हाड यांनी दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे. त्यामुळे इतर अनेक विकासकांची आता थकित रक्कम भरण्यासाठी धावपळ सुरु झाल्याची माहिती पुढे आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विरोधकांची घोषणाबाजी पाहून अजितदादांनाही आठवली ‘पायरी’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -