घरCORONA UPDATECoronaVirus : म्हाडा उभारणार कोविड केअर सेंटर!

CoronaVirus : म्हाडा उभारणार कोविड केअर सेंटर!

Subscribe

मुंबई महानगर प्रदेशात कोविड केअर सेंटर उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही केंद्र ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा- भाईंदर याठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

राज्यात गृहनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून ओळख असणाऱ्या म्हाडाला कोरोनाच्या संकटात नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशात कोविड केअर सेंटर उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही केंद्र ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा- भाईंदर याठिकाणी उभारण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली तसेच उर्वरीत महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता हा खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात येणार आहे.

याआधीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने वांद्रे कुर्ला संकुलात कोव्हिडच्या रूग्णांच्या उपचारासाठी १०२३ बेड्सचे रूग्णालय अल्पावधीत उभारले. तर आता म्हाडाकडून कोविड केअर सेंटरसाठी जागा शोधण्याचे काम सुरू झाले आहे. राज्य सरकारने म्हाडाकडे ही जबाबदारी दिली आहे. त्यानुसार ठाणे, कल्याण- डोंबिवली आणि मीरा -भायंदर याठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत. म्हाडाकडून आता जागांचा शोध सुरू झाला असून काही साईट्सवर जाऊन म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटही दिली आहे. ज्या रूग्णांना कोणतीही लक्षण नाहीत अशा रूग्णांसाठी ही कोविड केअर सेंटर्स उभारली जाणार आहेत. रूग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या सेंटरच्या ठिकाणी उपलब्ध असतील. एमएमआरडीए पाठोपाठ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फतदेखील ८०० बेड्सची सुविधा उफलब्ध करून देण्यात आली आहे. त्याठिकाणी २०० ऑक्सिजन असलेले बेड्स आहेत. तर दहिसर चेक नाका आणि बोरिवलीतील कांदेरपाडा येथे २५० बेड्सच्या सुविधेचे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.

- Advertisement -

कोविड केअर सेंटरमध्ये बेड्सची सुविधा असेल. त्याच बरोबर ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा असेल. पण याठिकाणी वेंटिलेटरची सुविधा नसणार आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात एमएमआरडीएमार्फत सुविधा उभारण्यात आली. तर आता मुंबई उपनगरात मात्र ठाणे, कल्याण, मीरा-भायंदर, कल्याण आणि डोंबिवली येथे म्हाडाकडून कोविड केअरची सुविधा देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -