घरमुंबईम्हाडा करणार जुन्या गाड्यांचा ई लिलाव

म्हाडा करणार जुन्या गाड्यांचा ई लिलाव

Subscribe

म्हाडा प्रशासनाने वांद्रे येथील गृहनिर्माण भवनामधील अधिकाऱ्यांसाठी काही वर्षांपूर्वी गाड्या खरेदी केल्या होत्या. या २९ गाड्यांमधील काही वाहने १२ वर्षांहून अधिक जुनी झाली आहेत. तर काही वाहने वापराविना पडून आहेत.

म्हाडाकडून (MHADA) लवकरच जुन्या वाहनांचा लिलाव (e-auction) करण्यात येणार आहे. लिलाव करण्यासाठी म्हाडाने निविदा मागवल्या आहेत. जुन्या गाड्यांचा (old vehicles) ई लिलाव होणार आहे. लिलावात सर्वात जास्त बोली लावणाऱ्यांना गाड्यांचा ताबा देण्यात येणार आहे.

म्हाडा अधिकाऱ्यांसाठी प्रशासनाने काही वर्षांपूर्वी २९ गाड्या खरेदी केल्या होत्या. या गाड्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांचा म्हाडा लिलाव करणार आहे. या २९ गाड्यांमधील १२ गाड्या सध्या वापरात आहेत. या गाड्यांचा लवकरच ई लिलाव केला जाणार आहे.

- Advertisement -

म्हाडा प्रशासनाने वांद्रे येथील गृहनिर्माण भवनामधील अधिकाऱ्यांसाठी काही वर्षांपूर्वी गाड्या खरेदी केल्या होत्या. या २९ गाड्यांमधील काही वाहने १२ वर्षांहून अधिक जुनी झाली आहेत. तर काही वाहने वापराविना पडून आहेत. या  २९ वाहनांचा ई लिलाव करण्याचा निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला आहे. लिलाव करण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये स्विफ्ट डिझायर, सुमो आदी गाड्यांचा त्यात समावेश आहे. ही लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २० जूनपूर्वी निविदा काढल्या जाणार आहेत.

दरम्यान, म्हाडा अनेक वर्षांपासून बंद असलेली १० वाहने भंगारात काढणार आहे. जुन्या गाड्या भंगारात काढण्यासाठी तसेच विक्री करण्यासाठी आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहनांची विक्री आणि ती भंगारात काढण्यासाठी आरटीओकडून आवश्यक परवानगी म्हाडाने घेतली आहे. त्यानुसार गाड्यांचा ई लिलाव करण्यात येणार आहे. लिलावासाठी २० जूनपूर्वी निविदा काढण्यात येतील, असे म्हाडातील अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -