घरमुंबईकोरोनाला रोखण्यासाठी सूक्ष्मस्तरीय नियोजन; होम क्वारंटाईन रुग्णांवर करडी नजर ठेवा

कोरोनाला रोखण्यासाठी सूक्ष्मस्तरीय नियोजन; होम क्वारंटाईन रुग्णांवर करडी नजर ठेवा

Subscribe

आयुक्तांचे यंत्रणेला आदेश

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होत आहे. याची गंभीर दखल पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली आहे.कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी. कोविड खाटांची संभाव्य गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व नियोजन तातडीने व सुव्यवस्थितप्रकारे करावे. हे नियोजन करताना आय. सी. यू. खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, औषधोपचार विषयक सामुग्री इत्यादी सर्व संबंधित बाबींचेही सूक्ष्मस्तरी नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी आज प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज एका विशेष आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी देखील मार्गदर्शन केले. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला महापालिकेच्या आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, महापालिका क्षेत्रातील विविध खासगी रुग्णालयांचे व वैद्यकीय प्रयोग शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता यावा आणि मुंबईकरांना दिलासा मिळावा, यासाठी पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी आज सर्वसंबंधीत अधिकारी यांची घेतली.

होम क्वारंटाईन असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचे ठसे उमटविणे बंधनकारक असून असे रुग्ण सार्वजनिक परिसरात किंवा घराच्याबाहेर वावरताना आढळल्यास त्यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करावा. तसेच, असे रुग्ण हे घरातच असल्याची खातरजमा करण्यासाठी ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारे दररोज ४ वेळा रुग्णांना दूरध्वनी करावेत व त्यांना घरातच राहण्याविषयी पुन्हा-पुन्हा सूचना द्यावी. या अनुषंगाने रुग्णाच्या घरी लॅण्डलाईन दूरध्वनी असल्यास त्यावर प्राधान्याने संपर्क साधावा, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिले आहेत.

- Advertisement -

सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड संशयितांची वैद्यकीय तपासणी, तपासणी अहवाल, लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन, रुग्णालयातील खाटांची उपलब्धता व व्यवस्थापन, विलगीकरण विषयक बाबी, जम्बो कोविड सेंटर, वॉर्ड वॉर रुम, सील्ड इमारती इत्यादी कोविडशी संबंधित विविध विषयांवर कोविड नियंत्रणाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.


हेही वाचा – अंधेरी येथील पबवर पालिकेची धाड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -