घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंचा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन, महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थान ट्रस्टचे...

उद्धव ठाकरेंचा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन, महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य

Subscribe

देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना फोन केला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश सरकारने बुधवारी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी जाहीर केली आहे. देशभरातून या २४ व्यक्तींची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांचे नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवले आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात. नार्वेकरांवर आणखी एक जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ट्रस्टच्या सदस्यांची नियुक्तीसाठी प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन नियुक्तीसाठी नाव सुचवतात. याप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती केली आहे. देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित असे आंध्र प्रदेशातील तिरूमला येथील तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते.

- Advertisement -

नार्वेकरांवर कोणत्या जबाबदाऱ्या

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गवर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झालीय. त्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचं वलय आता देश पातळीवर विस्तारल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झालीय.


हेही वाचा : Time Magazine च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -