घरमुंबईभिवंडीत दुधामुळे डोळे पांढरे

भिवंडीत दुधामुळे डोळे पांढरे

Subscribe

ऐन रमजानमध्ये दर ७० रु. लिटर

 

नितिन पंडीत

- Advertisement -

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात रोजा ( उपवास ) सुरू झाल्याने शहरात दुधाची मागणी वाढली आहे. या वाढत्या दुधाच्या मागणीचा फायदा घेत स्थानिक दुधविक्रेत्यांनी अचानक भाववाढ केली आहे. ईदपर्यंत दुधाचे दर एक लिटरमागे १०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या बेकायदा दरवाढीमुळे मुस्लीम बांधवांची ऐन रमजानच्या उपवास काळात लुबाडणूक होत आहे.
या दूध दरवाढीने मुस्लीम समुदायात नाराजी पसरली असून ऐन रमजान महिन्यात रोजा पाळणाऱ्या मुस्लीम बांधवांना आर्थिक फटका बसू लागला आहे. अचानकपणे दुधाचे दर वाढवून काळा बाजार करणाऱ्या दूध विक्रेत्यांवर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
भिवंडी शहरात ७० टक्के मुस्लीम बांधव राहतात. त्यातील बहुतांश कुटुंबातील महिला, पुरुष, वृद्ध महिनाभर नियमित रमजानचा उपवास रोजा पाळत असतात. दिवसभराचा कडक उपवास सोडण्यासाठी दुधापासून विविध पदार्थ बनविले जात आहेत. त्यामुळे दुधाच्या मागणीत वाढ होते.
रमजान महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून दुधाची मागणी वाढल्याने स्थानिक दूध विक्रेत्यांनी ५४ रूपये लिटर असलेले दूध १० रुपयांनी वाढवून थेट ६४ रुपये प्रती लिटर केले आहे. ते काही दिवसात सत्तरी पार करून ईदच्या सणापर्यंत १०० रुपयांवर पोहचेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शहरात दूध उत्पादकांची संघटना असून ग्राहक संघटना कार्यरत नसल्याने हीच संधी साधून दूध विक्रेते आर्थिक पिळवणूक करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -