घरठाणे४० डोंबिवलीकरांच्या बँक खात्यावर पडला लाखोंचा दरोडा

४० डोंबिवलीकरांच्या बँक खात्यावर पडला लाखोंचा दरोडा

Subscribe

लॉकडाऊनमध्ये आलेले आर्थिक संकट, त्यात ऑनलाईन दरोडेखोरांनी डोंबिवलीकरांंच्या बँक खात्यावर टाकलेल्या दरोड्यामुळे डोंबिवलीकरांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवर असलेल्या आयडीबीआय बँकेतील सुमारे ४० खातेदारांच्या खात्यातून अचानक रोकड गायब झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.

अज्ञात व्यक्तीने बँकेच्या शेजारीच असलेल्या एटीएम मशीनमध्ये स्किमर लावून खातेदारांच्या कार्डांची संपूर्ण माहिती गोळा करून ४० खातेदारांच्या खात्यावरून पैसे उडवले असल्याची माहिती डोंबिवली पोलिसांनी दिली आहे. आणखी देखील तक्रारदार पुढे येणाची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खात्यावर अचानक पडलेल्या दरोड्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

डोंबिवली पूर्व येथील फडके रोड या ठिकाणी आयडीबीआय बँकेच्या शाखेत लाखो डोंबिवलीकरांची खाती आहेत. रेल्वे स्थानकाजवळ असणार्‍या या बँकेचे शेजारीच एटीएम सेंटर असून या एटीएम सेंटरचा वापर दररोज हजारो खातेदार करतात. गुरुवारी अचानक अनेक खातेदारांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज येऊ लागल्यामुळे अनेकांनी आयडीबीआय बँकेच्या फडके रोडवरील शाखेत धाव घेतली.

एकाच वेळी ३० ते २५ खातेदार बँकेत आल्यामुळे गोंधळाचे वातावरण झाले होते. बँकेकडे प्रत्येकाची एकच तक्रार होती, खात्यातून अचानक पैसे काढण्यात आल्याची. बँक व्यवस्थापकांनी खातेदारांना शांत करून आपली लेखी तक्रार बँकेकडे द्या असे सांगण्यात येत होते. मात्र, खातेदार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -