घरमुंबईअजित पवारांच्या पत्रकारपरिषदेवर मिम्सचा पाऊस!

अजित पवारांच्या पत्रकारपरिषदेवर मिम्सचा पाऊस!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव ईडीच्या चार्जशीटमध्ये आल्यामुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचं अखेर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीर केलं. पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू मांडताना अजित पवारांना अश्रू अनावर झाले. अजित पवारांच्या पत्रकारपरिदेनंतर मात्र सोशलमिडीयावर मिम्सचा पाऊस पडला.

- Advertisement -

 

शिखर बँकेत झालेल्या आकड्यांमध्ये व्यावहारिकताच नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. ‘मागेही ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तेव्हा देखील मी अस्वस्थ झालो होतो. या प्रकरणात देखील ५ वर्षांपासून चौकशी सुरू होती. अजूनही ती संपत नाही. आता म्हणतात २५ हजार कोटींचा घोटाळा. लोकांना वाटेल की अजित पवारला हजार कोटींशिवाय दुसरं काही सुचतं की नाही? आम्हीही तुमच्यासारखीच माणसं आहोत. आम्हालाही भावना आहेत की नाही?’ असं अजित पवार म्हणाले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. यावर अजित पवारांची खिल्ली उडवली गेली.

- Advertisement -

‘पॉलिटीकर स्क्रीप्ट रायटींग हे माझ्या नवऱ्याची बायको मालिकेच्या स्क्रीप्टपेक्षाही फालतू असू शकते हे आज समजलं. अजित पवारांची दमदार अॅक्टींग बघून बॉलिवूड आणि हॉलिवूड मधून दादांना बिग बजेट चित्रपटाच्या ऑफर्स सुरू!’
तर दुसऱ्या मिम्समध्ये ‘काकांनी लिहीलेल्या स्क्रीप्टवर अजित दादांचा दमदार अभिनय..बेस्ट अॅक्टर २०१९’ लिहीले आहे. त्यामुळे सोशलमिडीयावर अजित पवारांच्या पत्रकारपरिषदेची खिल्ली उडवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -