घरमुंबईकेतकी चितळेच्या रुपाने मिनी कंगना जन्म घेतेय; नीलम गोऱ्हे यांची टीका

केतकी चितळेच्या रुपाने मिनी कंगना जन्म घेतेय; नीलम गोऱ्हे यांची टीका

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, राजकारणात एकमेकांविरोधात हिन पातळीवरचे वाभाडे काढणे सुरू आहे.

राराष्ट्रवादीचे (ncp) आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्या विरोधात महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मात्र खळबळ माजली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे केतकी चितळे (ketaki chitle) हिने केलेल्या मागणी बद्दल म्हणाल्या, केतकी चितळे हिच्या रूपाने महाराष्ट्रमध्ये मिनी कंगना (kangana) राणावत जन्माला येते आहे, असं नीलम गोऱ्हे (neelam gorhe) म्हणाल्या. त्याचसोबत नीलम गोऱ्हे म्हणल्या, विनयभंग झाला आहे कि नाही याचा निर्णय न्यायालयच देईल. जितेंद्र आव्हाड पुढे जात असताना त्या महिला समोर आल्या आणि आव्हाडांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. हे व्हिडीओ मध्ये दिसत आहे असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी या प्रकरणावर बोलताना, वैरभावना राजकीय नेत्यांच्या मनात येऊ नयेत, तसेच जितेंद्र आव्हाड यांनी संतापून किंवा दुःखी होऊन राजीनामा देऊ नये असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

Neelam Gorhe on ketaki chitale over ncp jitendra awhad molestation accusations maharashtra politics

यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm devdndra fadnavis) यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, राजकारणात एकमेकांविरोधात हिन पातळीवरचे वाभाडे काढणे सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुका लागतील असे सांगितले तर त्यांच्यावर काही लोकांनी टीका केली आहे असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

- Advertisement -

बाल दिनानिमित्त मुंबईत एका शाळेत कार्यक्रम ठरला होता त्याठिकाणी मुख्यमंत्री उशिरा पोहचले. मुख्यमंत्री यांनी शाळेचे विद्यार्थी म्हणजे गुवाहाटीला नेलेले आमदार नाही हे लक्षात घ्यायला हवं असा खोचक टोला देखील नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. 50 खोके वरुन बोलले तर एवढं का वाईट वाटतं, एका शिवसेना कार्यकर्त्याचा मला फोन आला होता ते त्यांना रुमाल भेट देणार आहेत, असेही गोऱ्हे म्हणाल्या.

नेमकं काय म्हणाली केतकी चितळे

ठाण्यातील विवियाना मॉल येथे हर हर महादेव चित्रपटात्या शो दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी रद्द केला त्यांनी केलेले हे कृत्य पूर्व नियोजित होते त्यामुळे त्यांच्यावर कलम 120 (ब) तसेच विनयभंग (354) ही कलमे लावण्यात यावी. अन्यथा, आम्ही हायकोर्टात दाद मागू अशी नोटीस अभिनेत्री केतकी चितळेने पोलिसांना पाठवली होती.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचे कलम लावण्यात यावे. ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्यावेळी त्या व्यक्तीची पत्नीही तिथे होती. त्यांनाही मारहाण झाली. कलम 120 (ब) लावण्यात यावे, कारण मॉलमधला धूडगूस हा प्लॅनिंगचाने केला होता. ते सर्व प्री प्लॅन होते. हे जर केले नाही, तर आम्ही हायकोर्टात दाद मागू असेही केतकीने नोटीसमध्ये म्हटले आहे.


हे ही वाचा – कायदा हातात घेतल्यास खपवून घेणार नाही; राष्ट्रवादीच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचा इशारा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -