मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्राला मंत्री आदित्य ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

Minister Aditya Thackeray replied to MNS president Raj Thackeray's letter
Minister Aditya Thackeray replied to MNS president Raj Thackeray's letter

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामधून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंनासत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असा इशारा दिला होता. या पत्रावर शिवसेना नेते मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

या पत्रावर आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला. मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही. महाराष्ट्रात आणि देशात अनेक मुद्दे असताना त्यावर कोणीही बोलत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना राजकारण नाही तर विकासाच्या मुद्द्यावर बोला असा सल्ला दिला.

महाराष्ट्रात, देशात अनेक महत्वाचे विषय आहेत. वाढती महागाई पाहता लोकांची सहनशीलता संपू लागली आहे. त्याच्यावर कोणीही बोलत नाही. जीएसटीचा परतावा मिळणे बाकी आहे. त्यासाठी पत्र लिहिले तर बरे होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी योध्येला आम्ही दर्शनासाठी जात आहोत, राजकारणासाठी नाही असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले. बेराजगारी, महागाई यावर कोणी बोलत नसून ५० वर्षांपूर्वी काय झाले यावर राजकारण केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान मनसे कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांचा गैरवापर होत असल्याचा राज ठाकरेंच्या आरोपावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस आपलं कर्तव्य पार पडत असून राज ठाकरेंनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना अटक करण्यासाठी मदत केली पाहिजे असे ते म्हणाले आहेत.