घरमुंबईचंद्रकांत पाटील माफीनामा, मराठा आरक्षण

चंद्रकांत पाटील माफीनामा, मराठा आरक्षण

Subscribe

१६जुलै ते २५ जुलै २०१८ या दहा दिवसांच्या कालावधीत चंद्रकांत पाटील यांनी तीनवेळा जाहीर दिलगिरी, माफी मागत आपणाला कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता... अशी नेहमीचीच टेप वाजवली. त्यामुळेच सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी एकच अजेंडा चंद्रकांत (दादा) असा ठरला आहे.

एखाद्या वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यावर वारंवार माफी मागण्याची वेळ येत असेल तर एक तर तो मंत्री अभ्यास न करता बोलतो किंवा तो मंत्री पक्षश्रेष्ठी यांच्या अत्यंत जवळचा असतो. असा हा योगायोग जुळून आला आहे तो महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, कृषी आणि फलोत्पादन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या नंतर हेवीवेट असलेले मंत्री आणि मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत(दादा) पाटील यांच्यासाठी.
१६जुलै ते २५ जुलै २०१८ या दहा दिवसांच्या कालावधीत चंद्रकांत पाटील यांनी तीनवेळा जाहीर दिलगिरी, माफी मागत आपणाला कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता… अशी नेहमीचीच टेप वाजवली. त्यामुळेच सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी एकच अजेंडा चंद्रकांत (दादा) असा ठरला आहे.

मराठा आरक्षण देण्याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली. त्या उपसमितीचे अध्यक्ष पाटील आहेत. मात्र मागील साडेतीन वर्षांत शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण किंवा अडचणीचा कुठचाही प्रसंग असल्यास चंद्रकांत (दादा) देवदूताप्रमाणे भाजप सरकारला वाचवण्यासाठी स्वयंसेवकाच्या भूमिकेत असतात. मात्र हीच भूमिका आता फडणवीस सरकारची डोकेदुखी बनली आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांचा माफीनामा

16जुलै : भूगोलच्या पुस्तकावरून 

इयत्ता सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात सात पाने गुजरातीत छापल्यावरून पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत झालेल्या गोंधळात सभागृहाचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या आरोपामुळे दुखावलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी सभागृहातच विष घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी चंद्रकांत(दादा) पाटील यांनी तिसर्‍या दिवशी सभागृहात दिलगिरी व्यक्त केल्यामुळे या वादावर पडदा पडला.

इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात सात पाने गुजरातीत छापल्यावरून विरोधकांनी १३ जुलै रोजी प्रचंड गोंधळ घातल्याने विधान परिषद दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली होती. दरम्यान, यावरून विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘तुम्हीच जोडून आणली ही पाने’, असा सुनील तटकरे यांच्यावर आरोप केला. त्यावर ‘हे मी छापून आणले हे तुम्ही सिद्ध केले तर इथेच विष घेऊन आत्महत्या करीन’, असा इशाराच तटकरेंनी दिला होता.

- Advertisement -

तटकरेंच्या वक्तव्यावर संपूर्ण सभागृह अवाक् झाले. त्यानंतर सभापतींनी काम दिवसभरासाठी तहकूब केले होते. सोमवारी चंद्रकांत(दादा) पाटील यांनी तटकरेंचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे जाहीर केले.मराठा आंदोलनाविषयी मी काहीही चुकीचं बोललो नसून वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र तरीही माझ्या बोलण्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो,असे चंद्रकांत (दादा) यांनी कोल्हापूर येथे स्पष्ट केले.

20 जुलै : रस्त्यावरील खड्ड्यावरून 

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईची अवस्था आहे. कल्याण डोंबिवलीत तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. कल्याण येथे खड्ड्यांमुळे पाच लोकांचा बळी गेला. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक अजब वक्तव्य केले. ज्या रस्त्यावर ५ लोकांचा बळी गेला त्याच रस्त्यावरून ५ लाख लोकांनी त्या दिवशी प्रवास केला. मग सगळाच दोष सरकारला कसा देता येईल? रस्त्यांची जबाबदारी ही महापालिकेचीही आहे. असे म्हणत त्यांनी खड्ड्यांची जबाबदारी शिवसेनेवर ढकलली. 

या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर मात्र त्यांनी दुसर्‍या दिवशी हे वक्तव्य कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी केले नव्हते असे म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून बराच वाद झाल्यावर या वादावर सारवासारव करत मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मी फक्त एक उदाहरण द्यायचे म्हणून बोललो होतो. मला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

२५ जुलै : आरक्षणावरून 

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा संघटनांनी आंदोलन सुरु केले असतानाच ‘या आंदोलनात काही पेड लोक घुसली असून हे आंदोलन बदनाम करुन महाराष्ट्र अस्थिर करण्याचा त्यांचा डाव आहे. राज्यात ५८ मोर्चे शांततेत काढणारा क्रांती मोर्चा अचानक हिंसक का होतोय, याचा विचार केला तर असे दिसते की, हे ठरवून केले जात आहे. निवडणूक वर्षात हे प्रकार वाढणार याचा विचार करून मराठा मोर्चाने अशा घुसखोरांना विचारपूर्वक दूर ठेवले पाहिजे, असा गंभीर आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलन सुरु असून या आंदोलनात सोमवारी औरंगाबादजवळ काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. यानंतर आंदोलन चिघळले असून मंगळवारी राज्यात बंदची हाक देण्यात आली तर बुधवारी मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये बंद पाडण्यात आला. आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काम केले आहे. आता हा मुद्दा न्यायालयाच्या अखत्यारित आहे. मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. पण शेवटी यात समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. काही पेड लोक या आंदोलनात घुसली असून त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, असे वक्तव्य केले होते. 

भविष्यात राज्याला माफीचे साक्षीदार शोधण्याची गरज नाही. माहिती न घेता एखाद्या विषयावर प्रतिक्रिया देणे आणि शांततेत असलेल्या जमावाला चिथावणी देणे याचे भान चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला असायला हवे. आम्हीही सत्तेत होतो मात्र विरोधी पक्ष खोटेच बोलतो आणि राजकारण करतो हा समज दादांनी सोडून द्यावा. – सुनील तटकरे,माजी प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -