घरताज्या घडामोडी'कर्नाळा नागरी सहकारी बँकेवर गुन्हा दाखल होणार'

‘कर्नाळा नागरी सहकारी बँकेवर गुन्हा दाखल होणार’

Subscribe

रागयड जिल्ह्यातील बहुचर्चित कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी बँकेवर लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

रागयड जिल्ह्यातील बहुचर्चित कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी बँकेवर लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता आहे. यासंदर्भातील कार्यवाही सुरु करण्यात आल्याची माहिती गुरुवारी राज्याचे सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी लेखी उत्तरात दिली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्यासह अनेक तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नाला उत्तर देताना लेखी उत्तरात बाळासाहेब पाटील यांनी वरील माहिती दिली आहे.

५१२.५४ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार

बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी नमूद केले आहे की, ‘कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे विशेष लेखापरिक्षण करण्यात आले होते. ज्यात ६३ कर्जप्रकरणांमध्ये ५१२.५४ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी १७ कर्ज प्रकरणांमध्ये ९५.३१ कोटींची रक्कम कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा अकादमी यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे समोर आले आहे. बँकेस झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यासाठी अधिनियमातील कलम ८८ अन्वये कार्यवाही करण्यासाठी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी लेखी उत्तरात दिले आहे. तर याप्रकरणी कलम ८१ अन्वये आर्थिक गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी यांनी पनवेल पोलीस स्टेशनच्या पोलीस निरिक्षकास फिर्याद दाखल करण्याबाबत पत्र दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याची माहिती यावेळी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर; पुढच्या २० दिवसांत पीक विम्याची रक्कम मिळणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -