घरCORONA UPDATECorona : राज्यमंत्री अब्दुल सत्तार लीलावतीत दाखल; होतोय श्वसनाचा त्रास

Corona : राज्यमंत्री अब्दुल सत्तार लीलावतीत दाखल; होतोय श्वसनाचा त्रास

Subscribe

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आपण घरातच उपचार घेत असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्रास जाणवू लागल्यामुळे अधिक उपचारासाठी लीलावतीमध्ये दाखल झाल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, माझी प्रकृती चांगली आहे. थोडा त्रास जाणवत होता म्हणून लीलावती रूग्णालय मुंबई येथे दाखल झालो आहे, चिंता नसावी.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली होती. दरम्यान, घरीच उपचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्या आधी अब्दुल सत्तार यांनी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतले होते. नंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. यापूर्वीही राज्यातील काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, वैभव नाईक, फौजिया खान यांनाही कोरोना झाला होता. काहींनी कोरोनावर मात केली असून काही नेते अजूनही उपचार घेत आहेत. या दरम्यान, आता अब्दुल सत्तार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

- Advertisement -

हेही वाचा –

कोकणात जाण्यासाठी यंदा लालपरी ऐवजी जलपरीची सेवा मिळणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -