Uday samant car accident: मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात; एक बॉडीगार्ड जखमी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला काल, बुधवारी रात्री ८ वाजता अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते एकदम सुखरुप आहेच. दुखापत झालेल्या सुरक्षा रक्षकावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार मुंबईमधील एका कार्यक्रमाला जात असताना सांताक्रुझ विमानतळ रस्त्याजवळ बुधवारी रात्री ८ वाजता उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला. स्पेशल सिक्युरिटी युनिटच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन ती उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. यावेळी उदय सामंत गाडीत एकटेच होते. या अपघातात उदय सामंत एकदम सुखरुप असून त्यांना कोणतीही जखम झाली नाही. एका सुरक्षा रक्षकाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर कपूर रुग्णालयात उपचार सुरू असून संरक्षण करणाऱ्या या व्यक्तीचा औषधोपचाराचा खर्च उदय सामंत करणार आहे.

 

या अपघाताबाबत उदय सामंत यांनी ट्वीट केले आणि म्हणाले की, ‘माझा छोटा अपघात झाला होता. मी सुखरूप आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. उद्या पासूनच मंत्रालयात तुमच्या सेवेत रुजू आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छासाठी धन्यवाद’

दरम्यान २००४ मध्ये उदय सामंत यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि आता ते ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.