रेल्वेने कोरोना नियमावली वाढली, मास्क नसल्यास भरावा लागेल ‘इतका’ दंड

ministry of railway has extended covid19 guidelines for next six months
रेल्वेने कोरोना नियमावली वाढली, मास्क नसल्यास भरावा लागेल 'इतका' दंड

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका वारंवार व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठीच्या कोरोना नियमावलीचा कालावधी वाढवला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाने हा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात किंवा रेल्वेगाडीत विना मास्क प्रवास करताना आढळल्यास त्या व्यक्तीकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जाणार असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

देशभरात आता नवरात्री, दसरा, दिवाळी अशा सणासुदीच्या दिवसांनी सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्सवानिमित्ताने रेल्वेत प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यावेळी रेल्वेत गर्दी होऊ नये, तसेच कोरोना संसर्गाला पुन्हा आमंत्रण मिळू नये यासाठी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून खबरदारी घेतली जात आहे.

याचपार्श्वभूमीवर उत्सव काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. यात मुंबईच्या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रेल्वेने मुंबई मार्गावर चालणाऱ्या १८ उत्सव विशेष रेल्वेच्या फेऱ्या ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. या सर्व रेल्वेच्या फेऱ्यांची मर्यादा ३१ ऑक्टोबरला संपणार होती. प्रवाशांची वाढती संख्या पाहता या रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये पाच महिन्यांसाठी वाढ करण्यात आली आहे.