घरमुंबईअल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या; जुहू परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष

अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या; जुहू परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष

Subscribe

जुहू येथील नेहरू नगर झोपडपट्टीतून बेपत्ता झालेल्या ८ वर्षांच्या मुलीचा आज सकाळी शौचालयात मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर संतप्त झालेला जमाव जुहू पोलीस ठाण्यावर जमला होता, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली. या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला असल्याचे समोर आले आहे. जुहू पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत तपास सुरु केला आणि देवेंद्र वड्डी नामक आरोपीला अटक देखील केली आहे.

- Advertisement -

अल्पवयीन मुलगी मृत आढळून आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मागच्या दोन दिवसांपासून सदर मुलगी बेपत्ता होती. त्यानंतर आज आज अचानक सार्वजनिक शौचालयात तिचा मृतदेह आढळला. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचा भडका उडाला. पोलिसांनीही आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपी देवेंद्र वड्डी हा याच परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीदेखील काही गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -