घरताज्या घडामोडीसंतापजनक! मुलाचा सांभाळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संतापजनक! मुलाचा सांभाळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Subscribe

नवी मुंबई शहरात एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस शहरात झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असताना एक संतापजनक घटना समोर आली आहे. नवी मुंबई शहरात एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका २५ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीच्या पत्नीवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

नेरुळ गावात आरोपी, त्याची पत्नी आणि सहा वर्षाचा मुलगा राहत होते. तर त्यांच्याच शेजारी पीडित मुलगी राहत होती. आरोपी आणि त्याची पत्नी नोकरी करत असल्याने आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याने पीडित मुलीला घरी आणले होते. त्याचदरम्यान त्याने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी आणि त्याच्या पत्नीवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

- Advertisement -

आरोपीची पत्नी गावी गेल्याने या नराधमाने त्याच संधीचा फायदा घेत पीडितीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यावेळी आरोपींने हा घडलेला प्रकार आई-वडिलांस सांगितल्यास ठार मारीन अशी धमकी देखील दिली होती. त्यामुळे पीडितीने घडलेला प्रकार घरी सांगितला नाही. हा दिवस अत्याचार सहन केल्यानंतर पीडितीचे पोट दुखू लागल्याने सदर प्रकार उघडकीस आला. त्यावेळी ती पीडित गर्भवती असल्याची बाब मुलीच्या पालकांच्या निदर्शनास आली. मुलीच्या आई-वडिलांनी आरोपी आणि त्याच्या पत्नीला जाब विचारला असता त्याच्या पत्नीने पतीकडून झालेली चूक मान्य करत पीडित मुलीला शिरवणे गावातील एका खासगी डॉक्टरकडे नेले. त्या डॉक्टरकडून दोन इंजेक्शन आणि दोन गोळ्या दिल्या. त्यानंतरही पीडित मुलीचा गर्भ वाढतच गेला. त्यावर पीडित मुलीच्या पालकांनी नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी आरोपीला अटक केली.


हेही वाचा – प्रियकरांनी काढला प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा; दगडाने ठेचून केली हत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -