मुंबईत अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार

गेल्या काही दिवसांत राज्यात मुलींच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाच मुंबईतील वांद्रे येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

minor girl was assaulted by two murderers in Mumbai

गेल्या काही दिवसांत राज्यात मुलींच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाच आता मुंबईतील वांद्रे येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यासाठी राज्य सरकारकडून कडक पाऊले उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, या घटनांना आळा बसताना दिसून येत नाहीये. मुंबईमध्ये एका सतरा वर्ष मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील वांद्रे येथे ही संतापजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथे एका 17 वर्षाच्या मुलीवर दोघांनी सामुहिक अत्याचार केला. पण त्याआधी या मुलीला त्या नराधमांनी गुंगीचे औषध दिले. त्यानंतर वांद्रे येथून तिचे अपहरण करून तिला विरार येथील वज्रेश्वरी परिसरात घेऊन गेले आणि त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने वांद्रे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींनी पीडित मुलीचे तिच्यावर अत्याचार करताना नग्न व्हिडीओ देखील बनवले आणि हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत या पीडित मुलीच्या कुटुंबियांवर देखील याबाबत कोठेही वाच्यता न करण्यासाठी दबाव टाकला.

दरम्यान, याबाबत कोणालाही काही सांगितले तर पीडित मुलीला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकीसुद्धा या नराधमांकडून देण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांत या आरोपींनी पीडितेच्या कुटुंबाला त्रासावून सोडल्याने अखेरीस पीडित मुलीच्या आईने याबाबत वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा – बोईसरमध्ये खोट्या नोटा चालवणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेत दोन्ही आरोपींनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, या आरोपींविरोधात पॉस्को आणि बलात्कार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.