Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर पालघर मीरा-भाईंदर महापालिका नरेंद्र मेहतांच्या दावणीला

मीरा-भाईंदर महापालिका नरेंद्र मेहतांच्या दावणीला

Subscribe

मीरा-भाईंदर शहरातील सर्वांत वादग्रस्त म्हणून ज्यांची ओळख आहे, असे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे लाड पुरविण्यासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी राजशिष्टाचाराला खो दिला आहे. त्यांनी स्वतःच्या कार्यालयातून कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करीत राजशिष्टाचारानुसार केंद्रीय मंत्र्यांनाही डावलून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वांत वर लिहिले आहे.

मीरा-भाईंदर शहरातील सर्वांत वादग्रस्त म्हणून ज्यांची ओळख आहे, असे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे लाड पुरविण्यासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी राजशिष्टाचाराला खो दिला आहे. त्यांनी स्वतःच्या कार्यालयातून कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करीत राजशिष्टाचारानुसार केंद्रीय मंत्र्यांनाही डावलून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वांत वर लिहिले आहे. त्यामुळे भाजप सत्ताधारी महापौरांनीच केंद्रीय मंत्र्यांचा हक्कभंग केला असल्याचे त्या कार्यक्रम पत्रिकेतून दिसून येते. शासन परिपत्रक, महासभा ठराव, पालिका परिपत्रकांचे उल्लंघन करून कार्यक्रम पत्रिका छापणे हे चुकीचे असतानाही मेहतांसाठी हा अट्टाहास चालू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

जिल्ह्यात केंद्रीय मंत्री, मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा सदस्य, खासदार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, महापौर व स्थानिक नगरसेवक यांना डावलून एखाद्या कामाचे भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटन करणे चुकीचे असतानाही मेहता सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत छापले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप यांनी महापालिका नरेंद्र मेहता यांच्या दावणीला बांधण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे, तर त्याच कार्यक्रम पत्रिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचेही नाव खाली टाकण्यात आले आहे.

- Advertisement -

एकेकाळी स्वतःहून भाजप सोडत असल्याबाबत ओरडून सांगणारे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता हे या कार्यक्रम पत्रिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही काशीमिरा येथील महाजनवाडी तलावाचे सुशोभीकरण करणे, कामाचे कार्यादेश मिळण्याच्या अगोदरच जाऊन भूमिपूजन सोहळा पार पाडल्याने भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांसह नगरसेवक सचिन म्हात्रे, नगरसेविका सुजाता पारधी व अन्य इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा प्रसिद्धी, बडेजावपणा, दिखावा करण्यासाठी पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेत स्वःतचे नाव छापण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. मेहता यांचे नाव छापले नाही तर कार्यक्रमाला जाणार नाही, असा नाराजीचा सूर महापौरांनी काढला आहे.

महापालिका बुद्ध विहार किंवा अन्य कार्यक्रमांचे उद्घाटन हे कुठल्याही विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, खासदार आणि महापौर यांचा हक्कभंग होणार नाही याची काळजी घेऊन होणार आहेत. महापालिकेने जिल्हाधिकार्‍यांची मान्यता घेऊन स्वतंत्र पत्रिका तयार केली आहे. त्यानुसार पालिकेचा कार्यक्रम पार पडणार आहे.
– दिलीप ढोले, आयुक्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -