घरमुंबईMira Road : तरुणाचे अजब धाडस, मीरा रोडमधील 'या' "खतरों के खिलाडी"चा...

Mira Road : तरुणाचे अजब धाडस, मीरा रोडमधील ‘या’ “खतरों के खिलाडी”चा व्हिडीओ पाहाच

Subscribe

मुंबई : वाहने चालवताना ती सावकाश चालवा, असे आवाहन नेहमीच वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत असते, तरी देखील मुंबईच्या रस्त्यांवर अनेक स्टंट पाहायला मिळतात. या स्टंटबाजी करणाऱ्यांना पोलिसांकडून दंडही ठोठावण्यात येतो. पण तरी देखील काही लोक सुधारताना दिसत नाही. परंतु, आता सोशल मीडियावर एका असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे पाहणाऱ्याचे डोळे नक्कीच पांढरे होतील. पण हा त्या तरुणाचा स्टंट आहे की, आणखी काही हे मात्र कळण्या पलीकडेच आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कोणताही कोणीही कुठल्याही प्रकारची उडी वगैरे मारलेली नाहीये. पण तरी देखील हा स्टंट करायला जिगर पाहिजे, असेही नेटकरी म्हणत आहेत. (Mira Road: Amazing courage of the young man, watch the video of “Khatron Ke Khiladi” in Mira Road)

हेही वाचा… ‘फाईटर’ चित्रपटातील दीपिका- हृतिकच्या चुंबन दृश्यावर विंग कमांडर सौम्यदीप दास यांचा आक्षेप !

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क आपल्या डोक्यावर भलीमोठी घोरपड घेऊन बाईक चालवताना पाहायला मिळत आहे. ते देखील मुंबईच्या गर्दीत. या तरुणाकडे अजब धाडस आहे, अशा कमेंट नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. हा व्हिडीओ normiemiraroad या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईतील मिरा-भाईंदर या भागातील आहे, अशी माहिती समोर आली आहे.

या व्हिडीओमध्ये बाईक चालवताना एका तरुण पाहायला मिळत आहे. पण या तरुणाच्या डोक्यावर चक्क एक घोरपड आहे. आधी लांबून पाहिले असता त्याने केसांची स्टाईल केली आहे असे वाटते. पण हा व्हिडीओ झूम करून पाहिला असता तेव्हा ती घोरपड नजरेस पडते. ही घोरपड मोठ्या ऐटीत त्याच्या डोक्यावर बसली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अनेक कमेंट करत आहेत. मिरा रोड हे ठिकाण बिगिनियर्ससाठी नाहीये, तर काही जण म्हणतायेत, हा एक मुंबईतला सामान्य दिवस आहे, असेही एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @normiemiraroad

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -