घरताज्या घडामोडीमिस इंग्लंड भाषा मुखर्जीने मुकूट उतरवून हातात घेतला 'स्टेथोस्कोप'

मिस इंग्लंड भाषा मुखर्जीने मुकूट उतरवून हातात घेतला ‘स्टेथोस्कोप’

Subscribe

भारतीय वंशाची भाषा मुखर्जी आता मूळ व्यवसायात उतरून रुग्णांची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे.

कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी २०१९ ची मिस इंग्लंड भाषा मुखर्जीने आपल्या डोक्यावरचा मुकूट उतरवून हातात ‘स्टेथोस्कोप’ घेतला आहे. भारतीय वंशाची भाषा मुखर्जी आता मूळ व्यवसायात उतरून रुग्णांची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे.

पुन्हा एकदा डॉक्टर पेशात परतली

कोरोनाच्या संकटात देश असल्याने ती पुन्हा एकदा डॉक्टर पेशात परतली आहे. कोरोना व्हायरसविरोधात ब्रिटनच्या लढाईत ती एनएसएसमध्ये सामील झाली आहे. ‘देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशाला माझी गरज आहे हा विचार करुन तिने रुग्णालयात परतण्याचा निर्णय घेतल्याचे भाषा मुखर्जीने सांगितले आहे’.

- Advertisement -

भाषा मुखर्जी मागील आठवड्यातच ब्रिटनला परतली आहे. मिस इंग्लंड ठरल्यानंतर ती जगातील विविध ठिकाणच्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. एका मुलाखतीत तिने सांगितले आहे की, ‘मी आफ्रिका, तुर्कीला तसेच भारतातही गेले होते. तसेच मला अनेक देशांचा दौरा करायचा होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे मला माझा दौरा अर्धवट सोडावा लागला आहे. कारण माझ्यासाठी रुग्णालय हे सर्वात चांगले ठिकाण असेल. तसेच मी घेतलेला हा निर्णय कठीण नव्हता’.

- Advertisement -

भाषा मुखर्जीविषयी थोडक्यात…

भाषा मुखर्जी ही भारतीय वंशाची ब्रिटिश नागरिक आहे. तिचे बालपण कोलकतामध्ये गेले आहे. ती नऊ वर्षांची होती, त्यावेळी तिचे कुटुंब ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. तर ऑगस्ट २०१९ मध्ये तिने मिस इंग्लंडचा किताब पटकावला होता. त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये तिने मिस वर्ल्ड स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. मिस इंग्लंडचा किताब जिंकण्यापूर्वी भाषा मुखर्जी बॉस्टनच्या पिलग्रिम हॉस्पिटलमध्ये ज्युनियर डॉक्टर होती. ती श्वसन रोगांची तज्ज्ञ आहे.


हेही वाचा – धक्कादायक! भारतात कोरोनाने घेतले १४९ बळी; २४ तासांत १७ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -