घरमुंबईMithi River Widening : महापुराची 19 वर्षे उलटूनही मिठी नदीची बाधक बांधकामे...

Mithi River Widening : महापुराची 19 वर्षे उलटूनही मिठी नदीची बाधक बांधकामे हटविणे सुरुच

Subscribe

मुंबई : 26 जुलै 2005 रोजी मुंबईत पूरस्थिती निर्माण होवून झालेल्या मोठ्या जिवीत व वित्तीय हानीला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीची विकासकामे आज 19 वर्षे उलटली तरी अद्यापही पूर्ण होत नाहीत. मुंबई महापालिका आजही नदीच्या रुंदीकरणात बाधक बांधकामे हटविण्याची कारवाई सुरुच आहे. (Mithi River Widening Even after 19 years of flood the removal of obstructions of Mithi River continues)

हेही वाचा – Sanjay Gaikwad : गायकवाड यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल होणार? युवकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

29 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पालिकेने मिठी नदीच्या रुंदीकरणात बाधक ठरलेल्या 672 झोपड्या तसेच अन्य अनधिकृत बांधकामे हटविण्याची धडक कार्यवाही केली. त्यामुळे मिठी नदीचा सुमारे 500 मीटर भाग मोकळा झाला असून नदीपात्राची रुंदी 40 मीटरवरून 100 मीटरवर नेण्यास मदत होणार आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

मिठी नदीतील सांडपाण्याचा प्रवाह योग्य करणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेकडून 2005 चा पूरस्थितीनंतर प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्ता बांधणे तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून तो मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी कामे हाती घेण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Politilcs : ‘सत्तेच्या मलिद्यासाठी एकत्र आलेले बोके…’; शिवेसना आमदारांच्या वादानंतर ठाकरे गटाची टीका

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून नदी रुंदीकरणाच्या कामात बाधक ठरणारी अतिक्रमणे, बांधकामे हटविण्याची कार्यवाही अधूनमधून केली जात आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये बक्षी सिंग कंपाऊंड येथील 100 मीटरचा परिसर मोकळा करून पर्जन्य जलवाहिनी विभागास हस्तांतरित करण्यात आला. सद्यस्थितीत त्या ठिकाणी 75 टक्के काम पूर्ण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -