घरताज्या घडामोडीपाण्यात 'हे' पदार्थ मिसळा आणि त्वचा डागविरहित करा

पाण्यात ‘हे’ पदार्थ मिसळा आणि त्वचा डागविरहित करा

Subscribe

तुमची त्वचा जर डागरहित असेल तर त्यासाठी हे रामबाण उपाय केल्यास तुमचा चेहरा नक्कीच सुंदर राहू शकतो.

अनेकांना आपली त्वचा ही डागविरहित हवी असते. त्याकरता अनेक उपाय देखील केले जातात. बऱ्याचदा बाजारातील उत्पादने वापरुन त्याचा चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो. मात्र, असे काही पदार्थ आहेत जे पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीरास त्याचा चांगला लाभ होतो. चला तर जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत.

लिंबू

- Advertisement -

लिंबू हे असे फळ आहे की, त्याचे अनेक लाभदायी फायदे आहेत. हेच लिंबू डागरहित त्वचेवर चांगले काम करते. यासाठी लिंबाचे काही थेंब पाण्यात मिसळल्याने पनक्रिया सुरळीत होते. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

स्ट्रॉबेरी

- Advertisement -

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे चेहऱ्यावर तजेला येतो.

मध

बॅक्टेरीयांशी लढण्यासाठी मध उत्तम उपाय आहे. तसेच मध चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो. त्याप्रमाणे मध पोटात गेल्याने देखील त्याचा तितकाच चांगला फायदा होतो.

पुदीना

पुदीन्याचे पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि चेहऱ्यावर तजेला येतो. उल्हाळ्यात हे पाणी प्यायल्याने टवटवीत वाटते.

दालचिनी

दालचिनीच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. पिण्याचे पाणी उकळताना त्यात चिमुटभर दालचिनी पावडर आणि सफरचंदाचे काही तुकडे घ्यालून त्या पाण्याचे सेवन करा. यामुळे त्वचा नितळ होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -