घरताज्या घडामोडीजपानच्या धर्तीवर एलटीटीत होणार मियावाकी गार्डन

जपानच्या धर्तीवर एलटीटीत होणार मियावाकी गार्डन

Subscribe

जपानी तंत्रज्ञानावर आधारीत मियावाकी गार्डन लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर तयार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहेत.

मर्यादित जागेत घनदाट झाडी निर्माण करणारे जपानी तंत्रज्ञानावर आधारीत मियावाकी गार्डन लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर तयार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहेत. तसा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करुन त्याकरिता लवकरच निविदा मागविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेकडून प्रस्ताव तयार

मध्य रेल्वे नेहमी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ९ रेल्वे स्थानकांवर ग्रीन पावर झोनची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये दादर, गोवंडी, कॉटन ग्रीन, भायखळा, सीएसएमटी, एलटीटी, उंबरमाळी आणि तानशेत या स्थानकांचा समावेश आहे. त्यानुसार सर्वप्रथम लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर ग्रीन पॉवर झोनची निर्मिती करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहेत. त्यानुसार एलटीटी स्थानकातील १५० चौरस फुट जागेवर जपानी तंत्रज्ञानावर आधारीत मियावाकी गार्डन तयार करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार केला आहे. मध्य रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी लोकमान्य टिळक टर्मिनस हे एक असून  रेल्वे स्थानक  परिसर खूप विस्तीर्ण आहे. त्यामुळे या स्थानकात खूप जागा रिकामी आहे. त्या जागेवर सौंदर्यीकरण करण्यासाठी या रेल्वे स्थानकाला ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आले. मियावाकी गार्डनमुळे स्थानकाचा परिसर हिरवागार होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

काय आहे मियावाकी गार्डन

जपानमधील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांची ही मूळ संकल्पना आहेत. यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी  मियावाकी यांनी उद्यानामध्ये दाटीवाटीने झाडे लावून, घनदाट जंगलाची संकल्पना राबवली. त्यामुळे विविध विकास कामांमुळे शहरांमध्ये कमी होणार्‍या झाडांची संख्या वाढली. पुढे ही संकल्पना विविध देशांच्या मोठ्या शहरांमध्ये राबवण्यात आली. विशेष म्हणजे राज्यात मियावकी तंत्रज्ञानावर घनदाट वृक्षलागवड करण्याचा यशस्वी प्रयोग सर्वप्रथम समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात करण्यात आला. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबवण्यात आला होता. त्यानंतर  मुंबईत ही संकल्पना 2 वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी राबवण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील ६५ जागांवर ३२ कोटी रुपये खर्चून ४ लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -