घरमुंबईमुंबईतील मियावकी झाडं प्राणवायू देण्यास सज्ज - आदित्य ठाकरे

मुंबईतील मियावकी झाडं प्राणवायू देण्यास सज्ज – आदित्य ठाकरे

Subscribe

भक्ती पार्कमधील पालिकेच्या उद्यानात मियावकी वन

मुंबईतील उद्यानात जुनपर्यंत ३ लाख मियावकी झाडे लावण्याचे टार्गेट असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील चेंबूरमध्ये गेल्या २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्बन फॉरेस्टरेशन सुरु केले. त्यावेळी २१ हजार झाडं लावलेली आता एकूण ५६ हजार झाडं लावण्यात आली आहेत. आगामी २ महिन्यात अजून १५ हजार मियावकी झाडं लावण्यात येणार आहेत. असे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. साधारण १ लाख झाडे ही एकट्या वॉर्डमध्ये लावण्यात येणार आहेत. मुंबईत ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी आणि इतर शहरांसाठी देखील मग ते पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या माझी वसुंधराच्या मार्फत अर्बन फॉरेस्ट ही कल्पना आणली आहे. असे पर्यावणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

अर्बन फॉरेस्ट कन्सेप्ट म्हणजे आपल्याला झाडे लावायचे असतील तर आपण जंगलाकडे जातो. तिथे आपण झाडे लावत असतो. परंतु तिथे आपण झाडे लावतो पण तिकडे शहरीकरण होते. जंगल तोडून सिमेंट काँक्रीटचे जंगल वाढत असते. तिथे मियावकी प्लांटेशन करुन झाडे लावणे गरजेचे असते आणि छोट्या जागेतही जास्त झाडे लावू शकतो. त्यामुळे मुंबईत जूनपर्यंत ३ लाख झाडे लावण्याचे टार्गेट ठेवले आहे. सव्वादोन लाख झाडे लावून पुर्ण केले आहेत.

- Advertisement -

मुंबईत २४ ठिकाणी मियावकी वने उभारण्यात आली आहेत. ही मियावकी झाडे आता चांगलीच बहरली आहेत. मुंबईकरांना ऑक्सिजन देण्यासाठी मियावकी झाडे सज्ज झाली आहेत. मुंबईतील भक्तीपार्कात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे पाहणी केली. हि वने जपानी पद्धतीने मुंबईत उभारली आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -