घरमुंबईMLA Disqualification Case : दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये खडाजंगी; नार्वेकर वैयक्तिक टिप्पणीवर नाराज

MLA Disqualification Case : दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये खडाजंगी; नार्वेकर वैयक्तिक टिप्पणीवर नाराज

Subscribe

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification) निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यला व्हीप मिळाला नसल्याचा दावा केला आहे. मात्र त्यावर ठाकरे गटाने पुरावे सादर करण्याची परवानगी मागितली आहे. याप्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. मात्र ठाकरे आणि शिंदे गटाxच्या वकिलांमध्ये युक्तीवाद करताना खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राहुल नार्वेकर यांनी दोन्ही वकीलांच्या वैयक्तिक टीका टिप्पणीवरून नाराजी व्यक्त केली. (Shiv Sena MLA Disqualification Case Clash between lawyers of both groups Assembly Speaker Rahul Narvekar took offense at the personal comment)

2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत ‘व्हिप’बाबत दोन्ही गटांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्या युक्तिवादावरील आपला निर्णय राखून ठेवतानाच दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याची मुदत 16 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर आता आजपासून (21 नोव्हेंबार) नियमित सुनावणी सुरू झाली आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाने कागदपत्र सादर केली आहेत. मात्र शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे त्यांना 24 तारखेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज केल्यामुळे तुषार दोशींना बढती – मनोज जरांगे पाटील

ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुनील प्रभूंच्या साक्षीचं वाचन केलं. यावेळी सुनील प्रभूंनी दिलेल्या साक्षीनुसार ठाकरे गटाने संबंधित कागदपत्रं सादर केली. त्यांची साक्ष विधीमंडळाकडून टाईप केली जात आहे. त्यात कुठलीही चूक होऊ नये, म्हणून विधीमंडळाकडून सुरु असलेली टायपिंग दिसण्यासाठी एक मोठी स्क्रीनही लावण्यात आली आहे.

- Advertisement -

ठाकरे गटाची मागणी विधानसभा अध्यक्षांनी मागणी फेटाळली

आमदार अपात्रता सुनावणीवेळी ठाकरे गटाने शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून सादर केले आहेत. या सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, अशी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी मागणी केली आहे. मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांची ही मागणी फेटाळली आहे. सर्व युक्तिवाद व आक्षेप रेकॉर्डवर घेतले जात असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता शिंदे गटाने पुराव्यांवर घेतलेले आक्षेप इथेच नोंदवले जावेत, ते बंद दारामागे होऊ नये आणि अध्यक्षांनी त्यावर काय निर्णय घेतला ते सुद्धा रेकॉर्डवर घ्यावं, अशी मागणी देवदत्त कामात यांनी केली आहे.

हेही वाचा – आपले साम्राज्यच बेईमानांच्या भरवशावर उभे करणाऱ्या… जितेंद्र आव्हाडांची अजित पवार गटावर टीका

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेला आहे. त्यामुळे सध्या राहुल नार्वेकर अॅक्शन मोडवर आले आहेत. लवकरात लवकर सुनावणी पार पडावी, यादृष्टीने राहुल नार्वेकरांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आजपासून पुढील तीन दिवस विधिमंडळात सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांची बाजू ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार, याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -