घरमुंबईआमदार किसन कथोरेंच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले!

आमदार किसन कथोरेंच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले!

Subscribe

मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुामरास घडली.

मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला बुधवारी दुपारी अपघात झाला. कथोरे यांच्या गाडीला मालवाहतूक करणाऱ्या एका ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला असून कथोरे यांच्या ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दुपारी सुमारे २ च्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेनंतर लागलीच कथोरे सुखरूप असल्याचे संदेश फिरवण्यात आल्यामुळे अफवांना आळा बसण्यास मदत झाली.

कसा झाला अपघात?

दुपारी कथोरे म्हसा परिसरातलं काम आटोपून पुन्हा मुरबाडला येत असताना मुरबाड-म्हसा चौकाजवळ सहयोग प्लाझासमोर या ट्रकनं कथोरेंच्या गाडी क्रमांक एम. एच. ०५ इए ४५६ला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की कथोरेंच्या ड्रायव्हरने चुकवूनसुद्धा त्यांच्या गाडीच्या पुढच्या बाजूला उजव्या भागाचं मोठं नुकसान झालं. यानंतर लागलीच कथोरेंच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ट्रकला अडवून त्याच्या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. यादरम्यान परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलीस ट्रकचालकासंदर्भात तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -