घरCORONA UPDATECoronaVirus - आणि आमदारानेच फवारणी करण्यास सुरुवात केली!

CoronaVirus – आणि आमदारानेच फवारणी करण्यास सुरुवात केली!

Subscribe

विलेपार्ले येथील श्रद्धानन्द रोड येथे रहाणाऱ्या व विमानताळ येथे नोकरी करणाऱ्या एका महिलेला करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली होती.

विलेपार्ले येथील श्रध्दानंद रस्ता येथे राहणाऱ्या एका महिलेला करोना विषाणुची लागण झाल्यामुळे महापालिकेने महिला राहत असलेली इमारतीचे निजंर्तुकीकरण केले. परंतु महापालिकेने केवळ एकाच इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी केल्यामुळे आसपासच्या इमारतीमधील नागरिकांनी भीती व्यक्त केली. त्यामुळे स्थानिक भाजप आमदार पराग अळवणी आणि नगरसेविका ज्योती अळवणी यांनी ५ पथके तयार करून आसपासच्या इमारतींमध्ये जंतूनाशकाची फवारणी केली. या पाच पथकाचे नेतृत्व करताना आमदार पराग अळवणी यांनी स्वत: अंगात पीपीई सदृश्य सूट चढवत स्वत:च फवारणीचे काम हाती घेत अनेक इमारतींमध्ये फवारणी केली.

विलेपार्ले येथील श्रद्धानन्द रोड येथे रहाणाऱ्या व विमानताळ येथे नोकरी करणाऱ्या एका महिलेला करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली होती. महापालिकेने खबरदारी घेत रुग्णाला रुग्णालयात तर घरच्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले. त्यानंतर या  इमारतीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. त्यानंतर नगरसेविका ज्योती अळवणी व आमदार पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखाली ०५  पथकामार्फत या इमारतीच्या आसपास च्या सुमारे ५० इमारतीं मध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. सुरवातीला आमदार पराग अळवणी यांनी सर्व कार्यकर्त्यांना या बाबत संपूर्ण माहिती  देवून फवारणी कशाप्रकारे करता येईल याची सुनिश्चित कार्यपध्दती अर्थात एसओपी तयार करून माहिती देऊन,महानगरपालिकेने सर्व आवश्यक खबरदारी घेतली असली लोकांमध्ये चिंता असल्यामुळे परिसरातील सर्व इमारतींमध्ये हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

इमारतींचे निर्जंतुकीकरण करत असताना कार्यकर्त्यांना सर्व सुरक्षा उपकरणे देण्यात आली तसेच आपापसात आवश्यक अंतर ठेवण्यास सांगितले होते.तसेच या परिसरातील इमारतींमधील प्रत्येक घराजवळ फवारणी केल्यामुळे घरातील सर्वाना त्याबाबत सतर्क करण्यात आले होते,असे अळवणी सांगितले. मात्र, ही फवारणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा करत यापुढे अशाप्रकारची फवारणी केवळ महापालिकाच करेल,असे जाहीर केले. परंतु हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असला तरी विभाग पातळीवर त्याबाबत कोणतेही आदेश नसल्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही ही फवारणी सुरुच ठेवली होती. विशेष म्हणजे अशा इमारतींमध्ये जावून फवारणी करण्यासाठी कार्यकर्ते यांची मानसिकता तयार होत नाही. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आमदार अळवणी यांनी स्वत: पीपीई सदृश्य सूट अंगात चढवून पाठिवर मशील अडकवून फवारणी करण्यास सुरुवात केली. संपूर्ण एक इमारत केल्यानंतरही त्यांना रहिवाशांनी ओळखले नव्हते आणि त्यांनीही  नागरिकांना आपली ओळख दिली . दुसऱ्या  दिवशी याबाबतचा व्हिडीओ सामाजिक माध्यमातून प्रसारीत झाल्यानंतर रहिवाशांना आमदार आपल्या इमारतीत फवारणी करून गेल्याची माहिती मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -