कारभारातील पारदर्शकतेबाबत निश्चित धोरण नसल्याने भ्रष्टाचार अटळ, आमदार रईस शेख यांचा आरोप

MLA Raees Sheikh alleges that corruption is taking place in Mumbai Municipal Corporation

मुंबई महापालिकेत प्रशासक नेमल्यापासून आर्थिक कारभारातील पारदर्शकतेबाबत निश्चित धोरण दिसून येत नाही. लोकप्रतिनिधीनी विकासकामे, मंजूर प्रस्ताव याबाबत माहिती मागूनही दिली जात नाही. त्यामुळे आता पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणे अटळ आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार व माजी नगरसेवक रईस शेख यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आली. त्यानंतर ८ मार्चपासून पालिकेचा कारभार हकण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल चहल यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नेमण्यात आल्यापासून कोणती विकासकामे करण्यात येत आहेत, कोणते व किती प्रस्ताव मंजूर करण्यात आले, याबाबत पारदर्शकता नाही व निश्चित धोरणही नाही. लोकप्रतिनिधी म्हणूनमी पत्र लिहून आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांच्याकडे व पालिका चिटणीस यांच्याकडे प्रत्येकी २ – २ वेळा मागणी करूनही मला त्याबाबत कोणतीही माहिती न देता ती माहिती लपविण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेत आर्थिक कारभारातील पारदर्शकतेबाबत निश्चत धोरण नसल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणे अटळ आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार व माजी नगरसेवक रईस शेख यांनी केला आहे.