संजय राऊत हा चवन्नी छाप माणूस, आमच्यावर मुंबई महापालिकेची सुडाने कारवाई – रवी राणा

MLA Ravi Rana criticizes MP Sanjay RautMLA Ravi Rana criticizes MP Sanjay Raut
MLA Ravi Rana criticizes MP Sanjay Raut

खासदार नवनीत राणा यांची तब्बेत ठीक आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. यावेळी त्यांनी संजय राऊत हा चवन्नी छाप माणूस आहे.आमच्या घराच्या बांधकामाबाबत कुठलेही उल्लंघन झालेले नाही, आमच्यावर महानगरपालिका सुडाने कारवाई करत आहे, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली. त्यांनी यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला.

आमच्यावर दबाव टाकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारवाई करत आहेत. मुख्यमंत्री कोणाला भेटत नाहीत. जिल्ह्यात फिरत नाहीत आणि मंत्रालयात येत नाहीत. तसेच आमदार, खासदार यांनाही भेटत नाहीत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत की नाही हेच माहीत पडत नाही, अशी टीका आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. आम्हाला जो त्रास झाला त्याची तक्रार एक ते दोन दिवसात दिल्लीत करणार आहोत. संजय राऊत आणि मंत्री अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत, त्यांना ही आम्ही तुरुंगात टाकू, असा इशारा रवी राणा यांनी यावेळी दिला.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी राणा दाम्पत्य मुंबईत धडकल्यानंतर नवनीत राणा आणि पती रवी राणा यांना अटक करण्यात आली. 12 दिवस तुरुंगात काढल्यानंतर नवनीत राणा यांची गुरुवारी जामिनावर सुटका झाली होती. त्याच दिवशी त्या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.