Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंट, क्लबवर धाडी

मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंट, क्लबवर धाडी

मुंबई महापालिकेची कारवाई

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा मुंबईकरांंवर लॉकडाऊनचे वादळ घोंघावू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या आणि कोरोना प्रसाराचा वेग यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने तातडीने पावले उचलली असून, नियम व आदेशाचं पालन न करणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. शनिवारी रात्री महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मुंबईतील तीन प्रसिद्ध रेस्टॉरंट व क्लबवर धडक कारवाई केली.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बृहन्मुंबई महापालिकेने कोरोना नियमावली जारी केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी महापालिकेच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे समोर येत असून, महापालिकेच्या अधिकार्‍यांनी शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील तीन रेस्टॉरंट आणि क्लबवर अचानक धाडी टाकल्या.

- Advertisement -

वांद्रे पश्चिम परिसरातील आयरिश हाऊस पाली हिल, खार येथील यू टर्न स्पोर्ट्स बार आणि कर्तार पिल्लर बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट या तिन्ही रेस्टॉरंट व क्लबची पाहणी केली. यावेळी कोविड संदर्भात महापालिकेने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले जात असल्याचे अधिकार्‍यांना आढळून आले. वांद्रे वेस्ट बारमध्येही १०० पेक्षा अधिक लोक विनामास्क असल्याचे आढळून आले. महापालिकेने आयरिश हाऊसकडून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० हजार, यू टर्न स्पोर्ट्स बारला २० हजार कर्तार पिल्लर बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटला ३० हजार, तर बांद्रा वेस्ट बारला ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

दुबईहून आलेल्या चार जणांवर कारवाई

परदेशातून येणार्‍या प्रवाशांना मुंबई महापालिकेने सात दिवसांसाठी क्वारंटाईन सक्तीचे केले आहे. मात्र, दुबईतून आलेल्या चार प्रवाशांनी क्वारंटाईन नियमांचा भंग केला. सात क्वारंटाईन न राहता प्रवाशांनी मध्येच पोबारा केला. याप्रकरणी महापालिकेने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -