घरCORONA UPDATEअबब! कोविड रुग्णालयातील एका बेडसाठी येतो अडीच लाखाचा खर्च

अबब! कोविड रुग्णालयातील एका बेडसाठी येतो अडीच लाखाचा खर्च

Subscribe

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावानंतर बेड मिळणे अशक्य झाले होते. अश्यावेळी एमएमआरडीए प्रशासनाने कोविड १९ अंतर्गत बांधलेल्या रुग्णालयावर तब्बल ५३ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. प्रत्येक बेड मागे अडीच लाख रुपये खर्च झाला असून ५३ कोटींमध्ये २११८ बेड तयार करण्यात आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे कोविड १९ अंतर्गत बांधलेल्या पहिला आणि दुसऱ्या टप्प्यामधील रुग्णालयाची विविध माहिती विचारली होती. अनिल गलगली यांस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण ५३ कोटी खर्च करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सिव्हील आणि इलेक्ट्रिकल यावर १४ कोटी २१ लाख ५३ हजार ८२५ रुपये इतका खर्च झाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २१ कोटी ५५ लाख २५ हजार ३५३ रुपये खर्च झाला आहे. दोन्ही टप्प्यात बेड संख्या ही १०५९ असे एकूण २११८ अशी आहे. प्रथम टप्प्यात उपकरणे आणि साहित्यावर ५ कोटी २६ लाख ४७ हजार ४०६ रुपये खर्च करण्यात आले असून द्वितीय चरणात १२ कोटी ६ लाख ३३ हजार २५९ रुपये खर्च करण्यात आले आहे. या सुविधांत ऑक्सिजन, आयसीयू, डायलिसिस, ट्रायेज यांचा समावेश आहे.

- Advertisement -

कोविड १९ अंतर्गत खरेदी, कामे आणि सेवा आपत्कालीन परिस्थिती व तातडीची निकड असल्याने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय तसेच विशेष परिस्थिती व तातडीची खरेदी यानुसार केंद्र शासनाच्या अर्थ विभागाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे. अनिल गलगली यांच्या मते भलेही निविदा काढल्या नसल्या तरी एमएमआरडीए प्रशासनाने सर्व खर्चाची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे जेणेकरुन कोणालाही याचे निरीक्षण करणे सहज शक्य होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -